शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

कचरा डेपो आंदोलन तीन महिने स्थगित

By admin | Published: June 10, 2017 2:01 AM

पुणे महापलिकेच्या आयुक्तांनी येथील जमीनधारकांच्या वारसांचा नोकरीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी असून पालिकेत तीन महिन्यात

लोकमत न्यूज नेटवर्कफुरसुंगी : पुणे महापलिकेच्या आयुक्तांनी येथील जमीनधारकांच्या वारसांचा नोकरीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी असून पालिकेत तीन महिन्यात त्यांना नोकऱ्या मिळतील. असे लेखी पत्र दिल्याने आज येथील ग्रामस्थांनी सुरु केलेले कचरा डेपो बंदचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित केले आहे. तीन महिन्यांनंतर जर प्रशासनाने आपला शब्द पाळला नाही तर डेपोवर कचऱ्याच्या गाड्या नव्हे तर एकही अधिकारी फिरकू देणार नाही आणि टाळे ठोकू असा इशारा दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.आज सकाळी येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले. कचऱ्याच्या गाड्या परत पाठवल्या. त्यानंतर आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे येवून ग्रामस्थांची भेट घेतली चर्चा करुन लेखी पत्र ग्रामस्थांना दिले. मध्यम व दीर्घकालिन करावायची घनकचरा जनजागृत्ती, नागरिकांचा सहभाग, कचरा विलगीकरण, संकलन, प्राथमिक व दुय्यम वाहतुक, प्रक्रिया तसेच भविष्यात निर्माण ( दहा वर्ष) होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन यासाठी लागणारी आवश्यक जमीन त्याचे आरक्षण, भूसंपादन व या सर्व बाबीसाठी करावी लागणारी अंदाजपत्रकीय आर्थिक तरतूद व त्याअनुषंगाने करावयाचे कालबध्द नियोजन व त्याचे प्रभावीपणे अंलवजावणीसाठी करावयाच्या उपाययोजना यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार कृती आराखडा प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी महापौर व आयुक्तांना आराखड्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेने कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमीनधारकांच्या वारसांना नोकरीबाबतचा पाठिवेला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आहे.तसेच उरुळी देवाची फुरसुंगी येथील साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करुन रिकाम्या होणाऱ्या जागेपैकी उर्वरित जागा वापराबाबत सर्वसामान्य धोरण ठरविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अनुषंगिक मागण्याबाबत सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सुचित केले आहे, असे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.