शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दौंडच्या भाजी मंडईचा होतोय कचरा डेपो

By admin | Updated: May 10, 2017 03:47 IST

दौंड शहराचा विकास केवळ शासकीय जागेअभावी रखडलेला आहे. एकीकडे विकासासाठी शासनाच्या जागा मिळाल्या पाहिजेत

मनोहर बोडखे । लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंड शहराचा विकास केवळ शासकीय जागेअभावी रखडलेला आहे. एकीकडे विकासासाठी शासनाच्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी सातत्याने ओरड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत होत असते; परंतु आहे त्या शासकीय जागेत नगर परिषदेने उभारलेल्या इमारतींची दुरवस्था झाली ती केवळ प्रशासन आणि विशेषत: राजकीय मंडळींच्या उदासीन धोरणामुळे. नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी उभारलेल्या भाजी मंडईचे वाढीव बांधकाम अर्धवट स्वरुपाचे असून खितपत पडलेल्या या जागेत घाणीचे आणि मोकाट जनावरांचे साम्राज्य आहे. तर, इमारतीच्या छताच्या भागाचा स्वच्छतागृह म्हणून सर्रास उघड्यावर वापर होत आहे. प्रामुख्याने याचा उपद्रव व्यापारी आणि शहरातील नागरिकांना होत आहे. दौंडला दररोज आणि आठवड्याचा बाजार एकाच परिसरात भरतो. त्यामुळे मंडईत खरेदीसाठी नागरिकांची दररोज वर्दळ असते. परंतु, शासनाच्या जागेवर भाजीमंडई वाढीव बांधकाम या आरक्षणावर नगर परिषदेने अनुदान आणि कर्ज घेऊन ३० ते ३५ वर्षांपूर्वी भाजी मंडईची इमारत उभारली असल्याचे समजते. यातील काही गाळे हे बंद स्वरूपात आहेत. काही गाळ्यांमध्ये व्यापार सुरू आहे. तर, हजारो स्क्वेअर फूट बांधकाम अर्धवट स्वरूपात धूळ खात पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यावर मात्र नगर परिषदेचे निर्बंध नाहीत. कचऱ्याबरोबरीने मांजर, कुत्री, मोकाट जनावरांचा संचार असतो; त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात घाणीची दुर्गंधी पसरते. याचा उपद्रव येथील व्यापारी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. परंतु, तोंड दाबून मुक्याचा मार व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. तेव्हा पडीक असलेल्या या जागेतील घाण त्वरित काढण्यात यावी, की जेणेकरून व्यापारी आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल.