शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची घंटागाडी ठरतेय शोभेची वस्तू

By admin | Updated: May 31, 2017 01:34 IST

परिसरात आलेल्या कारखानदारीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वराळेत कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. गावातील कचरा

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : परिसरात आलेल्या कारखानदारीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वराळेत कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी मंजूर होऊन आलेली घंटागाडी सुरू होण्याआधीच अखेरच्या घटका मोजू लागली आहे. या गाडीचा वापर होत नसल्याने ती गंजू लागली आहे. कचरा उचलला जात नसल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीग साचले आहे. याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. काँर्निंग इंडिया, सिंड्रेल, महिंद्रा यासह अनेक लहान मोठ्या कंपन्या वराळे गावाच्या परिसरात आल्या आहेत; त्यामुळे गावचे नागरिकीकरण वाढले आहे. परंतु या वाढत्या नागरिकीकरणाला सेवा देण्यास ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. कचऱ्याच्या समस्येने तर गावाला वेढले आहे. उद्योगांमुळे गावात बाहेरील नागरिक कामानिमित्त आले आहेत. यामुळे पायाभूत सुविधांवरील भार वाढला आहे. गावाची कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ठाकर यांनी त्यांच्या निधीतून एक घंटागाडी मंजूर केली होती. परंतु ही गाडी गावात आल्यापासून एकाच जागी उभी आहे. नवी कोरी गाडी येथील प्राथमिक शाळेच्या आवारात एका कोपऱ्यात उभी आहे. तीचा वापरच होत नसल्याने तिला गंज चढतो आहे. यामूळे ही गाडी खराब होण्याच्या मार्गावर आहे. गाडीवर फक्त जाहिरातबाजी होत आहे. गाडीला नंबर फ्लेटही नाही. त्यामुळे ही घंटागाडी गावासाठी केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. कचरा पेटवल्याने धुराचे लोट : आरोग्य धोक्यातसाठलेला कचरा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे धुराचे लोट तयार होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक वेळा त्यात ओला कचरा असल्याने त्याची दुर्गंधी सुटत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी सिमेंटच्या कचरा कुंड्या आणल्या आहेत. परंत कचरा त्यात टाकण्याऐवजी आजुबाजुलाच टाकत आहेत. वाढत्या कचऱ्याच्या खाद्य पदार्थावर जगणाऱ्या घुशी आणि भटक्या कुत्र्यांचे मात्र चांगले फावले आहे. या मोठमोठ्या घुशींचा त्रास मात्र गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांपासून वाटसरूंना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. गावातील कचऱ्याचे वाढते साम्राज्य आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याचा विचार करून अडगळीत पडलेली आणि कचरा जमा करणारी घंटागाडी गाडी बाहेर काढून तिचा वापर करावा आणि नागरिकांना सेवा द्यावी.