शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट रकमेत गैरव्यवहार

By admin | Updated: February 2, 2016 01:09 IST

मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला

लासुर्णे : मार्च २०१४ मध्ये गारपिटीमध्ये लासुर्णे (ता. इंदापूर) गावात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाने या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला. परंतु, लासुर्णे गावात या गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. लासुर्णेतील आरटीआय कार्यकर्ते पंकज निंबाळकर यांनी इंदापूरच्या तहसीलदारांकडे सबळ पुराव्यासह प्रकरण २२ मे २०१५ रोजी दाखल केले. आठ महिने उलटले तरीही गारपीट नुकसानभरपाईच्या गैरव्यवहारातील अधिकारी मोकाट आहेत. इंदापूरचे तहसीलदार चौकशीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते निंबाळकर यांनी केला आहे. येथील गावात गारपिटीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. गारपिटीच्या नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार केल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. यामध्ये शासकीय नियमानुसार हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात येते. अनेकांना ३० गुंठे क्षेत्राला ४५ ते ४८ हजार रुपये मदत म्हणून वाटण्यात आले. आठ ‘अ’ क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर वाटप केले गेले आहे. पंचनामे करताना भुसार पिकाऐवजी फळबागा दाखविल्या गेल्या. खरे नुकसान झाल्ोल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच दिली गेली नाही. काही शेतकऱ्यांना एकाच पिकासाठी दोन वेळा नुकसानभरपाई दिली गेली. या पंचनाम्याची कोठेही आवक-­जावकची नोंद दिसून येत नाही. काही शेतकऱ्यांची नमूद केलेली खाती नसतानाही नुकसानभरपाई काढली गेली आहे. तलाठी व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मदतीत गैरव्यवहार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे,असा निंबाळकर यांचा आरोप आहे. तक्रार करूनही भरपाईच्या वाटपात गैरव्यवहार करणारे कर्मचारी मोकाट आहेत.