शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडल्याने कोरड्या माळरानावर अवतरली गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उंडवडी कडेपठार : कधी कधी नैसर्गिक अापत्ती एखाद्या भागासाठी वरदानदेखील ठरते. कायम दुष्काळी असलेल्या बारामती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उंडवडी कडेपठार : कधी कधी नैसर्गिक अापत्ती एखाद्या भागासाठी वरदानदेखील ठरते. कायम दुष्काळी असलेल्या बारामती तालुक्यातील कारखेल येथील माळरानावर शुक्रवारी (दि. ९) वीज पडली. वीज ज्या जागेवर पडली त्या भेगेतून कोरड्या माळनावार अक्षरश: पाण्याचा लोंढा वाहू लागला आहे. वीज पडल्यामुळे आमच्या गावात गंगा अवतरली अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

बारामती तालुका कायम आवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. येथील सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमिटरच्या दरम्यान असते. बारामती तालुक्याचा बहुतांश भाग जिरायतीपट्ट्यामध्ये मोडतो. कारखेल हे गावदेखील जिरायती पट्ट्यात येते. पाण्याचे दुर्भीक्ष या भागात कायमच असते. गेली २-३ दिवसापासून उंडवडी कडेपठार तसेच आसपाच्या परिसरात झिमझिम सुरू आहे. कारखेल येथे शुक्रवार (दि.९) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडाक्यात पाऊस सुरू झाला. कारखेलचे ग्रामदैवत कोरेश्वर मंदिराच्या परिसरात वीज पडल्याने माळरानावर वीज पडलेल्या जागेवर जमिनीतून पाणी उपळत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गावतील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांनी माळरानावर अचानक जमिनीतून पाण्याचा वाहताना दिसले. या प्रवाहाने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा पाहण्यात येत आहे. या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ तसेच इतर परिसरातील ग्रामस्थांनी पाणी पाहण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

याठिकाणी कायमच पाण्याचे दुर्भीक्ष असते. उन्हाळ््यामध्ये जनावरांसह माणसाचे देखील पाण्यामुळे हाल होतात. वीज पडल्याने आमच्या दुष्काळी गावात गंगा अवतरली आहे, अशी प्रतिक्रिया मेंढपाळ किसन तांबे, ग्रामस्थ राजहंस भापकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

फोटो ओळी : कारखेल येथे वीज पडल्याने जमिनीतून पाणी उपळू लागले आहे. वीज पडलेले ठिकाण व पाणी दाखवताना ग्रामस्थ.

१००७२०२१-बारामती-१६