शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

गंगाधामला जल्लोष

By admin | Updated: April 26, 2017 04:01 IST

सकाळचं कोवळं ऊन... डीजेचा ठेका... उत्साहाने भारलेले वातावरण... जल्लोष आणि नृत्य...‘लोकमत’च्या धमाल गल्लीतील ही धमाल मार्केट यार्ड

सकाळचं कोवळं ऊन... डीजेचा ठेका... उत्साहाने भारलेले वातावरण... जल्लोष आणि नृत्य...‘लोकमत’च्या धमाल गल्लीतील ही धमाल मार्केट यार्ड येथील गंगाधाम सोसायटीतील रहिवाशांनी अनुभवली. सापशिडीपासून अँग्री बर्ड्सपर्यंत, बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत, सायकलिंगपासून मोपेड राईडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. इथे अवतरला होता सळसळता उत्साह, आनंद आणि बिनधास्तपणा... खळाळत्या जल्लोषाला रिमिक्स गाण्यांचा तडका नाचायला भाग पाडत होता.लहानपणीच्या आठवणी जागवणाऱ्या सापशिडीच्या खेळात लहानग्यांपासून वृद्धांनीही हिरीरीने सहभाग घेतला. कार्यक्रमात अनेक लहान मुले, पालक व ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा सहभागी झाले होते. यातील वेगवेगळ्या खेळांमुळे लहान मुलांचे मनोरंजन झाले असून त्याचा आनंद पालकांनाही मिळत होता. धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्राफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, बँड परफॉर्मर्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश असून लहान मुलांसाठी अँग्री बर्ड्स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक खेळ ठेवण्यात आले.या उपक्रमात अनेकांनी भाग्यवान होण्याची स्पर्धा मिळवली आहे, त्यामध्ये चांदीची नाणी जिंकणे, सायकल चालविणे, पुणेरी पगडी घालणे, मेंदी काढणे या गोष्टी करायला मिळाल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रायोजक काकी खाकरा अँड फूड प्रॉडक्ट, ट्री हाऊस स्कूल, मॅपल, सायकल पार्टनर, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर रोझरी, सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर एच. पी. ज्वेलर्स होते. झुम्बासाठी राहिल चौहान, बॉलिवूड डान्ससाठी डान्स फ्लोअर स्टुडिओ व निखिल डान्स स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले. चेतन अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. योगासाठी साधना लेले, देवव्रत लेले, गायत्री पारसवार यांचे सहकार्य लाभले.