शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: खेड पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर: खेड पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कारवाई करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १६ चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ५ आरोपींना अटक करून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नवनाथ विजय पवार (वय २१ रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर), सुनील रामनाथ जाधव (रा. माणुसवाडी, रणखांब, संगमनेर), अजित रावसाहेब केदार (रा.रणखांब उपळी, ता. संगमनेर) रमेश अंबादास दुधवडे (रा. खैरेदरा, नांदुर ता. संगमनेर ), शिवाजी पोपट कातोरे (रा .जांबुत ता. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मागील आठवड्यात खेड पोलिस ठाण्याचे कर्मचारी दुपारी गस्त घालत असताना राजगुरुनगर येथील पाबळ रस्त्यावर दोघे दोन दुचाकींवर संशयीतरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. नवनाथ विजय पवार (वय २१ रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर), सुनिल रामनाथ जाधव (रा. माणुसवाडी, रणखांब, संगमनेर) असे नावे सांगुन दोन्ही गाड्या जानेवारी महिन्यात चोरल्याची कबुली त्यांनी दिली.

त्यांच्या आणखी सहकाऱ्यांना पकडण्यासाठी खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथक तयार करून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी संगमनेर तालुक्यात सापळा लावला. अजित रावसाहेब केदार (रा.रणखांब उपळी, ता. संगमनेर) रमेश अंबादास दुधवडे (रा. खैरेदरा, नांदुर ता. संगमनेर ), शिवाजी पोपट कातोरे (रा. जांबूत, ता. संगमनेर ) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच खेड तालुक्यातील राक्षेवाडी पाबळ रोड येथे एक ज्युपीटर मोटारसाइकल, तसेच घारगाव, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, निघोज, पारनेर, अकोले येथून १५ मोटारसायकल चोरुन आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमारे ४ लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस विभागीय आधिकारी अनिल लंबाते, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, सुधीर शितोळे, संतोष मोरे, विशाल कोठावळे संतोष शिंदे यांनी सहभाग घेतला.

फोटो ओळ: खेड पोलिसांनी मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून त्याच्याकडून १६ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.