यवत : दोन वेगवेगळ्या जबरी चो:यांमधील आरोपींना पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे. मागील सात महिन्यांत यवत व वरवंड गावांच्या हद्दीत सदर जबरी चो:या घडल्या होत्या.
यवत येथे 25 एप्रिल 2क्14 रोजी रात्नी 1क् वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सचिन दत्तात्नय बोत्ने (वय 4क्, रा. दत्तनगर, यवत, ता. दौंड) हे व्यापारी त्यांचे हार्डवेअरचे दुकान बंद करून घरी जात असताना चोरटय़ांनी दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, दोन्ही हातातील तीन सोन्याच्या अंगठय़ा, मनगटी घडय़ाळ, पाकिटातील रोख रक्कम, डेबिट कार्ड, मोबाईल असा एकूण एक लाख 32 हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी यवत पोलीस तपास
करीत होते.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, एस. पी. जाधव, पोलीस हवालदार बच्चाराम भिसे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पंडित, रूपेश नावडकर यांनी आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी दिली आहे. (वार्ताहर)
4दोन्ही चोरीच्या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी जेरबंद
4यवत व वरवंडमध्ये घडल्या होत्या जबरी चो:या
4अटक आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता
4यवत पोलिसांची कामगिरी