पिंपरी : प्राधिकरण येथील सिंधुनगर युवक मित्र मंडळाने प्राधिकरण परिसराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सिंधुनगर एलआयजी कॉलनी येथील पूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅ मेऱ्याने संरक्षित करण्यात आला आहे. प्राधिकरण परिसरात वारंवार चोऱ्या होतात. या भागात यापूर्वी २ मोठ्या चोऱ्या झाल्या होत्या. हे चोर पकडण्यात या मंडळाला सीसीटीव्हीमुळे यश आले. यामुळे दोन्ही चोऱ्यांचे फुटेज या गणेश मंडळाला मिळाले होते. यामुळे चोरी करणारे चोर यशस्वीरीत्या पकडण्यात पोलिसांना यश आले. या मंडळाचे अध्यक्ष अरुण थोरात आहेत. या मंडळापासून प्रेरणा घेऊन याच परिसरातील मंडळांनी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या मंडळाच्या वतीने नचिकेत बालाग्राम येथील आश्रमास दर वर्षी हनुमान जयंतीनिमित्त शिधा दिला जातो, तर प्राधिकरण परिसरातील महिलांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी या मंडळाने परिसरात ७० बकेटचे वाटप केले. तसेच या वर्षी मंडळाने ७०० झाडे परिसरात वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ही रोपे वाटण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
वर्गणीतून गणेश मंडळाने लावले सीसीटीव्ही कॅ मेरे
By admin | Updated: September 27, 2015 01:38 IST