शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करून फ्लॅटच्या व्यवहारात गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर दिल्यानंतर लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या सायबर चोरट्याने ५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर दिल्यानंतर लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या सायबर चोरट्याने ५० हजार रुपयांना गंडा घातला.

याप्रकरणी सुबोध लोणकर (वय २४, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

लोणकर यांच्या वडिलांचा कळस भागात फ्लॅट आहे. फ्लॅट भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात लोणकर यांनी एका संकेतस्थळावर टाकली होती. त्यानंतर चोरट्याने लोणकर यांच्या आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लष्करात अधिकारी असल्याची बतावणी चोरट्याने केले. पुण्यात नेमणूक झाली असून विश्रांतवाडी भागात फ्लॅट भाडेतत्वावर घ्यायचा आहे, अशी बतावणी चोरट्याने केली.

त्यानंतर चोरट्याने फ्लॅटचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले. फ्लॅटच्या व्यवहारातील पैसे ऑनलाइन पाठवितो, अशी बतावणी त्याने केली. लोणकर यांच्या आईने याबाबतची माहिती लोणकर यांना दिली. लोणकर यांना अ‍ॅपद्वारे खात्यावर एक रुपया पाठविण्यास चोरट्याने सांगितले. त्यानंतर चोरट्याने लोणकर यांचे खात्यातून दोनवेळा ऑनलाइन व्यवहार करून प्रत्येकी २५ हजार रुपये लांबविले. लोणकर यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे तपास करत आहेत.