शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणपती माझा नाचत आला..!

By admin | Updated: August 30, 2014 01:55 IST

गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष.. ढोल-ताशांचा गजर.. सनई चौघड्याचे मंगलमयी सूर... आबालवृद्धांचा ओसंडून वाहणारा उत्साह..

वाशिम : येथील राजे वाकाटक वाचनालय आणि संस्कारभारती शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक मूर्ती कार्यशाळेत ११७ जणांनी सहभाग नोंदविला.या कार्यशाळेच्या माध्यमातून मूर्तिकार व संस्कार भारतीचे पुरुषोत्तम मुंधरे, अनिल मुंधरे यांनी सहभागी सदस्यांना मूर्ती निर्मितीविषयी मार्गदर्शन केले.सहभागी सदस्यांमध्ये गृहिणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कार्यशाळेत मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती नागपूरवरुन आणण्यात आली होती. माती भिजवून तिचा एक गोळा प्रत्येक सहभागी सदस्यांना देण्यात आला. जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत आपल्यातील संपूर्ण कसब पणाला लावून मूर्तीकलेला आत्मसात करण्याचे काम केले. या कार्यशाळेचे संचालन अमोल काटेकर व आरती बावणे यांनी केले. यावेळी मूर्तिकार पुरुषोत्तम मुंधरे, अनिल मुंधरे यांच्यासह डॉ. जयंत अहाळे यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना आपल्या घरासह इतरही घरी कशी करता येईल, याबाबत जागरुक राहून प्रबोधन करण्याचे आवाहन संस्कार भारतीचे अमोल काटेकर यांनी केले. स्वत:च बनविलेल्या मूर्ती घरी घेऊन जाणार्‍या कार्यशाळेतील सहभागी सदस्यांचा उत्साह त्यांच्या चेहर्‍यांवर ओसंडून वाहत होता.