शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड खून प्रकरणाला कलाटणी

By admin | Updated: December 27, 2016 03:09 IST

वडकी (ता. हवेली) येथे १९ डिसेंबर रोजी शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) यांचा जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी महाराष्ट्र केसरी

लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथे १९ डिसेंबर रोजी शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) यांचा जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड याच्यासह आठ जणांनी कोयता, तलवार व लोखंडी सळयांचा वापर करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून गायकवाड यांच्या चुलतभावाने सुपारी देऊन घडवून आणला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने आणखी ३ जणांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मेघराज विलास वाहळे (वय २३, रा. भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (वय २४, रा. कर्वेनगर साइबाबा मंदिरासमोर, पुणे, मूळ वरवडे, ता. आंबेगाव) दत्तात्रय महादेव पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना अटक करण्यात आली असून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी अटक केलेले सहा जण न्यायालयीन कोठडीत आहेत.तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरीमकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड या पथकाची नेमणूक केली होती. हे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना त्यांना खरे खुनी दुसरेच असल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबरला मेघराज विलास वाहळे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाजी गायकवाड यांचा पुतण्या पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याने खुनाची सुपारी दिली होती व त्याने शिवाजी यांचा खून केल्यावर माझा भाऊ अनिल गायकवाड, उत्तम गायकवाड यांच्यासह १३ जणांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी हेमंत प्रकाश गायकवाड (वय ३२, रा. वडकी) याचा गोळ्या झाडून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली होती. याच्याविरुद्ध दाखल असलेल्या खुनाच्या मोका केसमधील साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊन मोक्याची केस ढिली होऊन त्याचे भाऊ जेलमधून सुटण्यास मदत होईल व त्याने वरील तिघांना ठराविक रक्कम देण्याचे कबूल करून काही आगाऊ रक्कम दिली. यानंतर पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याच्या सांगण्यावरून शिवाजी दामोदर गायकवाड याच खून केला. (वार्ताहर)