पुणे : महाविद्यालयीन मुलीचा पाठलाग करीत तिला मारहाण करून त्रास देणाऱ्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, हा प्रकार मागील एक वर्षापासून सुरू होता. घाबरलेली मुलगी घरी काहीही सांगत नव्हती; मात्र हा त्रास खूपच वाढल्याने तिने शेवटी कुटुंबीयांना याची माहिती दिली. संदीप प्रेम गवळी (वय २७, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी बारावीमध्ये शिकते. तिच्या घराजवळच राहणारा संदीप तिचा पाठलाग करायचा. तो तिला महाविद्यालय परिसर तसेच घराजवळ अडवत नेहमी फिरायला येणार का, अशी विचारणा करीत होता. नकार मिळताच शिवीगाळ करीत मारहाण करायचा. हा प्रकार घरी सांगितल्यास घरामधून उचलून नेण्याची धमकी त्याने दिली होती. (प्रतिनिधी)
मुलीला छेडणारा गजाआड
By admin | Updated: January 10, 2017 03:39 IST