शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पालिका विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: November 17, 2014 04:54 IST

महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचे अधिकार शिक्षण मंडळ सदस्यांना की प्रशासनाला, याविषयीचा गोंधळ सुरू आहे.

पुणे : महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचे अधिकार शिक्षण मंडळ सदस्यांना की प्रशासनाला, याविषयीचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन व शिक्षणप्रमुख यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अनेक सुविधांचे निर्णय प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. शिक्षण मंडळाच्या कारभारावर ‘प्रशासकीय राज’ आल्याने सदस्य आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. तसेच, शिक्षण मंडळातील सदस्यांचे अधिकार पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा निर्णय जून २०१३ ला घेण्यात आला होता. मात्र, तत्कालीन काँग्रेस आघाडीने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अस्तित्वातील शिक्षण मंडळ सदस्यांना कालावधी पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी शिक्षण मंडळाचा कारभार सुरू होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून मंडळाच्या सदस्यांचे अधिकार महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व शिक्षणप्रमुख यांनी परस्पर घेतले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सहा महिन्यांत एकही सभा झालेली नाही. आजही १३० वर्ग खोल्या शिक्षकाविना आहेत. विद्यार्थ्यांना वह्या, चित्रकला साहित्य व शिष्यवृत्ती अद्याप देण्यात आलेली नाही. या सावळ्या गोंधळामुळे प्रशासनाकडून सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या कायद्याचे उल्लंघन होत आहे, असा दावा मंडळाचे सदस्य शिरीष फडतरे यांनी केला आहे. त्याविषयी शिक्षणप्रमुख बबन दहिफळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)