शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराचा खर्च महापालिका करणार

By admin | Updated: April 25, 2016 01:25 IST

पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारण्याचा प्रस्ताव सभेने मंजूर केला.

रहाटणी : पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारण्याचा प्रस्ताव सभेने मंजूर केला. बेवारस मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सर्वसाधारण सभेत या विषयीचा विषय मंजूर केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध धर्म, पंथांतील व्यक्तींच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार आहे. मात्र, पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकडे उपलब्ध करून देण्याचा खर्च पालिका देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. गॅसदाहिनी, विद्युतदाहिनी आणि दफनभूमी यांमधील अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी पालिका घेणार आहे. तसेच, बेवारस मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातील, अशी उपसूचना मंजूर केली. स्मार्ट सिटी योजनेच्या यादीतून ऐनवेळी वगळल्यानंतर महापालिकेचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्याअंतर्गत पाणीपुरवठा, जलनि:सारण, उद्यान, पावसाळी गटर योजना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. त्याचा सुमारे तीन हजार १९८ कोटी रुपये खर्चाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. त्यापैकी एक हजार ६६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून, ५३३ कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. उर्वरित एक हजार ५९९ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला उभारावी लागणार आहे. (वार्ताहर)