शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराची अंत्ययात्रा सहकारनगर पोलिसांना भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव वाघाटे याच्या खुनानंतर त्याच्या साथीदारांनी काढलेल्या अंत्ययात्रेकडे स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगार माधव वाघाटे याच्या खुनानंतर त्याच्या साथीदारांनी काढलेल्या अंत्ययात्रेकडे स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. त्याची पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ आणि गुन्हे अशा दोन्ही पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत तर, गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली केली. तर सायबर व आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत.

माधव वाघाटे याचा बिबवेवाडी पोलीस चौकीसमोर खून झाला होता. त्यानंतर त्याची अंत्ययात्रा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी येथून कात्रज स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली होती. याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस उपायुक्तांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सर्वांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ चे उपायुक्त यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिवसभर तळ ठोकून या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविली. दिवसभरात १०० हून अधिक जणांना पकडण्यात आले. सध्या त्यांची रवानगी कारागृहात केली. अजूनही त्यातील सहभागी असलेल्यांची शोध मोहीम सुरू आहे.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला सामाजिक सुरक्षा विभागाबाबत तक्रारी असल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी एकाचवेळी सामाजिक सुरक्षा विभागातील सर्व कर्मचा-यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर प्रथमच एखाद्या पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलीस निरीक्षकांचा एकाचवेळी बदल्या झाल्या आहेत.