शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या नवविवाहितेवर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 04:57 IST

माहेरच्या लोकांनी घर दिले पेटवून

सांगवी (जि. पुणे) : अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेने सासरच्या छळास कंटाळून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. शिर्सूफळ (ता. बारामती) येथे गेल्या शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. कोमल सचिन आटोळे (वय २३) असे मृत महिलेचे नाव आहे. संतप्त नातेवाइकांनी कोमलचे अंत्यसंस्कार पतीच्या बंगल्यासमोर केले. तसेच सासरचे घर पेटवून देत पती, सासू, नणंद यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या बाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.पती सचिन कोंडीराम आटोळे, सासू बकुळाबाई, (दोघे रा. शिर्सूफळ), नणंद नंदाबाई नवनाथ शिंगाडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांच्यावर आत्महत्येप्रकरणी, तर कोमलचे वडील प्रकाश जयसिंग गावडे, आई मंगल, भाऊ सागर, विशाल हरिभाऊ गावडे, विकास हरिभाऊ गावडे, सागर गावडे, संतोष गावडे (सर्व रा. पारवडी, ता. बारामती) यांच्यावर घर पेटवून दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, सासू आणि नणंद यांनी अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या कोेमलकडे टीव्ही, सोन्याची अंगठी तसेच कारसाठी दीड लाखांची मागणी करीत छळ केला. त्याला कंटाळून तिने कीटकनाशक घेतले. तिचा रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.‘औषध समजून प्यायले कीटकनाशक’कोमलच्या सासरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोमलने खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक प्राशन केले होते. मृतदेहावर सासरच्या बंगल्याच्या आवारातच अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी घरात घुसून घरातील संपूर्ण सामान जाळले. तसेच घरही पेटवून दिले.

टॅग्स :Suicideआत्महत्या