शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत निधीची लयलूट

By admin | Updated: January 23, 2016 02:40 IST

सर्वसाधारण सभेतील निर्णयांनाही कशी स्वार्थाची झालर असते, याचे प्रत्यंतर महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आज पुणेकरांना दिले.

पुणे : सर्वसाधारण सभेतील निर्णयांनाही कशी स्वार्थाची झालर असते, याचे प्रत्यंतर महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आज पुणेकरांना दिले. कृषी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एका खासगी संस्थेला विनाचर्चा तब्बल ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले, तर पुण्याची ओळख असणाऱ्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाला १ लाख रुपये देण्याचा विषय लांबणीवर टाकण्यात आला.मीडिया रूटस् या संस्थेच्या वतीने कृषी सन्मान पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील कर्तृत्वनान शेतकरी तसेच शेतीविषयक काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला मदत म्हणून पालिकेने ५ लाख रुपयांची देणगी द्यावी, असा विषय सभागृहनेते बंडू केमसे व शारदा ओरसे यांनी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. एका शब्दाचीही चर्चा न होता या विषयाला मंजुरी देण्यात आली. वास्तविक कोणत्याही संस्थेला पालिकेच्या वतीने ३ लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी देऊ नये, असा सर्वसाधारण सभेचाच ठराव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा देणग्या देण्यावर राज्य सरकारनेही अनेक निर्बंध टाकले आहेत. त्या सगळ्या नियम, संकेत, कायद्याला धाब्यावर बसवत कसलीही चर्चा न करता मीडिया रूटस् या संस्थेला तब्बल ५ लाख रुपये देण्याचा विषय मंजूर झाला. भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर, अशोक येनपुरे, अंदाजपत्रकातील रक्कम आहे, पुढच्या सभेपर्यंत विषय नेऊ नका, द्या मंजुरी अशी विनंती करीत होते, मात्र शिंदे यांनी ती मान्य केली नाही. मीडिया रूटस् या संस्थेला ५ लाख रुपये देण्याचा विषय ज्याचा होता, त्या सभागृहनेते केमसे यांनीही केळकर संग्रहालयाच्या देणगीचा विषय एक महिना पुढे नेण्यास संमती दिली. (प्रतिनिधी)