शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या कामाला निधीचे इंधन

By admin | Updated: March 20, 2017 04:20 IST

पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी

पुणे : पुणे मेट्रोसाठी अंदाजपत्रकात तरतूद झाल्याने या कामाला गती येणार आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर या तीन शहरांतील मेट्रोसाठी ७१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १३० कोटी रुपये पुण्यासाठी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुणे, मुंबई आणि नागपूर या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासाठी सरकारने महामेट्रो ही कंपनी स्थापन केली आहे. अंदाजपत्रकात निधीची तरतूद करताना राज्य सरकारने या तीन व भविष्यात अन्य शहरांमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी म्हणून एकत्रितपणे ७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून पुण्याच्या वाट्याला किती पैसे येणार, हे स्पष्ट होत नसले तरी साधारण १३० कोटी रुपये मिळतील, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अंदाजपत्रकात फक्त उल्लेख असून, केंद्र सरकार पुरस्कृत ९९० कोटी २६ लाख रुपयांच्या या प्रकल्पात पहिल्या वर्षासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यासाठी या तरतुदी स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले. अंदाजपत्रक पुण्यासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्य सरकारने १ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)