शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सेवांचे संपूर्ण संगणकीकरण

By admin | Updated: May 12, 2017 05:33 IST

महापालिकेच्या सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा संकल्प अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ४५ कोटी २४ लाख

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा संकल्प अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ४५ कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार असून त्यामधून सेवा सुलभ करणारे विविध प्रकारचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित होणे अपेक्षित आहे.विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांना द्यावयाचा मोबदला ‘थेट लाभ हस्तांतर’ धोरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाद्वारे थेट त्याच्या बॅँक खात्यात जमा करण्याकरिता संगणकप्रणाली विकसित करण्यात येणार आहे. विविध विभागांचे डॅशबोर्ड विकसित करणे, उपलब्ध संगणकप्रणाली मधील माहितीचे कामनिहाय विश्लेषण करणारे अ‍ॅप्लिकेशनही विकसित करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.केंद्र सरकारच्या कॅशलेस इकॉनॉमी या योजनेला प्रतिसाद म्हणून महापालिकेचा करभरणा तसेच विविध प्रकारच्या दाखल्यांचे शुल्क वगैरे सर्व प्रकार कॅशलेस करण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्राथमिक सुविधा तयार करण्यावर आगामी वर्षात भर देण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांना संगणकसाक्षर करण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करणे, तिथे प्रशिक्षण देणारी व्यवस्था तयार करणे, महापालिकेच्या विविध उपक्रमांचे तंत्रज्ञानाचा वापर करून ब्रॅडिंग करणे या गोष्टी करण्यात येणार आहेत.