बारामती : बारामती शहरात इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी सोमवारी (दि, १२) रस्त्यावर उतरले. या वेळी सायकल रॅली काढत केंद्रातील भाजपच्या मोदीसरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
सामान्य जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवले आहेत. सामान्य नागरिकांना दर वाढवून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याची टीका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. बारामती तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.
गुणवडी चौक येथील काँग्रेस भवन ते इंदापूर चौक येथे असणाऱ्या पेट्रोल पंपापर्यंत यावेळी सायकल रॅली काढण्यात आली. तसेच केंद्र सरकारचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व फलक दाखवत निषेध केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सायकलसह उपस्थित होते. सोमवारी दिवसभर काँग्रेसचे कार्यकर्ते मोदीसरकारचा निषेध म्हणून दिवसभर सायकल वापरणार असल्याचे वीरधवल गाडे यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य आकाश मोरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, शहराध्यक्ष अशोक इंगोले, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष वैभव बुरुंगले, डॉ. विजय भिसे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अॅड. आकाश पांडे, राहुल वाबळे, शिवाजीराव काकडे, विपुल तावरे, सुशांत सोनवणे आदी उपस्थित होते.
————————————————
फोटो ओळी :बारामती शहरात काँग्रेस भवन येथून काढलेली सायकल रॅली.
१२०७२०२१-बारामती-०३
————————————————