पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) संचालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वाद सुरू असताना पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री मारहाण केली. यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घातला. सोमवारी रात्री साडेबारापर्यंत हा वाद सुरू होता.विद्यार्थी गेल्या ६७ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी २००८च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे असेसमेंट करून त्यांना संस्थेतून बाहेर काढण्याचा आदेश दिल्लीतून एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना देण्यात आले. त्यानुसार संचालकांनी २००८च्या बॅचचे असेसमेंट करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचा विरोध डावलून नोटीस काढण्यात आली. चिडलेल्या विद्यार्थ्यांनी संचालकांच्या कार्यालयात दुपारी ३ च्या सुमारास धाव घेतली आणि त्याचा जाब विचारला. मात्र, संचालकांनी कोणतेच उत्तर न दिल्याने विद्यार्थ्यांनी संचालकांना बाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे रजिस्ट्रारने रात्री पोलिसांना बोलावले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना गळा पकडून, काठीने मारत, धक्काबुक्की करीत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात संचालकांच्या कार्यालयातील काचा फुटल्या. (संबंधित वृत्त/८)
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पोलिसांची मारहाण
By admin | Updated: August 18, 2015 03:57 IST