पुणे : थंडीचा कडाका वाढल्यामुळे गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे फळभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा, वांगी, ढोबळी मिरची, तोंडली, बीट, घेवड्याच्या दरात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, टोमॅटोच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. तर आवक वाढल्यामुळे हिरवी मिरची, चवळी, पडवळ, गाजर, ढेमसे, भुईमूग, मटार, पावटा, लसूण यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथील बाजारामध्ये १६०-१७० ट्रक इतकी आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ४ ते ५ ट्रक कोबीची, राजस्थानातून ९ ते १० ट्रक गाजर, तर जयपूर, जबलपूर आणि हिमाचल प्रदेश येथून १० ते ११ ट्रक मटारची आवक झाली. पुणे विभागातून सातारी आल्याची ५०० ते ४५० पोती, बेंगलोरी आल्याची १५० पोती, टोमॅटोची ४.५ ते ५ हजार पेटी, फ्लॉवरची १४ ते १५ टेम्पो, कोबीची १४ ते १५ टेम्पो, सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पो, मटारची पारनेर भागातून २ टेम्पो, तांबडा भोपळ्याची १० ते १२ टेम्पो, पावट्याची ५ ते ६ टेम्पो, जुन्या कांद्याची २ ते ३ ट्रक, नवीन कांद्याची १०० ट्रक, तळेगाव, वाठार या स्थानिक बटाट्याची ३० ट्रक, तर आग्रा, मध्य प्रदेश येथून लसणाची ३० हजार गोणींची आवक झाली फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा जुना ४०० -५००, नवा : १५०-२७०, बटाटा :(स्थानिक) ६०-७०, (आग्रा) : ८० - ११०, लसूण १०००- १६००, आले सातारी ३००-३५०, बेंगलोरी २००-२५०, भेंडी २५०-३५०, गवार : गावरान ३००-४००, सुरती ३००-४००, टोमॅटो २०० - ३००, दोडका २५०-३००, हिरवी मिरची १५०-२००, काकडी १०० - १५०, कारली : हिरवी २५० -३००, पांढरी २००- २२०, पापडी २००-२५०, पडवळ १५०-१६०, फ्लॉवर ८० - १२०, कोबी ७०-१२०, वांगी १५० -२२०, डिंगरी २०० - २५०, ढोबळी मिरची १५०-२००, तोंडली : कळी १५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा ५००-६००, गाजर : १५०-२००, वालवर २००-२५०, बीट १५० - १५०, घेवडा ४००-४५०, भुईमुग शेंग ५००-५५०, मटार : स्थानिक ४५०-५००, परराज्य ४५०-५००, पावटा २५०-३०० , तांबडा भोपळा ६०-१००, सुरण २४०-२५०, नारळ १०००-१६००, मका कणीस शेकडा २००-३००, प्रति १० किलो : ६०-१००. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर : कोथिंबीर २०० - ६००, मेथी ३०० - ६००, शेपू ५०० - ७००, कांदापात ५०० - १०००, करडई ४०० - ५००, पुदिना ३००-५००, अंबाडी ४००-५००, मुळे ८००-१२००, चवळई ४००-५००, पालक ३००-५००, हरभरा ५००-८००.
फळभाज्या महागल्या; १७० ट्रक आवक
By admin | Updated: November 30, 2015 01:53 IST