शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’साठी बारामतीत ठिय्या!

By admin | Updated: December 22, 2014 23:41 IST

छत्रपती कारखान्याने पहिली उचल एफआरपीनुसार २२०४ रुपये प्रतिटन द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली

बारामती : छत्रपती कारखान्याने पहिली उचल एफआरपीनुसार २२०४ रुपये प्रतिटन द्यावी, या मागणीसाठी शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीच्या वतीने काटाबंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, जमावबंदीच्या आदेशामुळे काटाबंद ऐवजी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, बाळासाहेब कोळेकर, तानाजीराव थोरात, शिवाजीराव निंबाळकर, बाळासाहेब शिंदे, सतीश काटे, अ‍ॅड. शिवाजी थोरात, अ‍ॅड. संभाजीराव काटे, किशोर मासाळ, गणेशराव फडतरे, जयवंतराव जाचक आदींसह इतर ऊसउत्पादक उपस्थित होते. या वेळी जाचक म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारकिर्दीत सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले. मात्र, आता सत्तापालट झाल्याने सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आणणारी मंडळी घरी बसली आहे. छत्रपती कारखान्याचा एफआरपीनुसार पहिला हप्ता २२०४ रुपये असूनदेखील १८०० रुपये देण्यात आला. खासगी कारखानदारांच्या हितासाठीच पहिली उचल ४०० रुपयाने कमी देण्यात आली. वास्तविक पाहता एफआरपी कायद्यानुसार पहिला हप्ता १४ दिवसांच्या आत न दिल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे. गेल्या वर्षी आम्ही एफआरपी कमी दिल्याने न्यायालयात गेल्याने एफआरपीच्या फरकाची रक्कम कारखान्याला व्याजासह सभासदांना द्यावी लागली. याचा बोजा सभासदांवरच पडला आहे.