शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मानांकित खेळाडूंची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:15 IST

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशा जोशी

पुणे : पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशा जोशी, अनीहा डिसुझा, पृथा वर्टीकर, अंकिता पटवर्धन, सलोनी शाह, सनत बोकिल, शौनक शिंदे, सनत बोकिल, रजत कदम, रोहन खिंवसरा यांनी गुरूवारी आपापल्या गटांतून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ज्युनिअर (१८ वर्षांखालील) मुलींच्या गटामध्ये झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अव्वल मानांकित इशा जोशी हिने प्रीती गाढवेवर ११-८, ११-९, ११-५ने मात केली. दुसºया मानांकित अंकिता पटवर्धनने स्वप्नाली नारळेवर १६-१४, ६-११, १२-१०, ११-८ने विजय मिळविला. तिसºया मानांकित अनीहा डिसुझाने मृण्मयी रायखेलकर हिचा ११-६, ११-९, ६-११, ११-६ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.सातव्या मानांकित पृथा वर्टीकर हिने बिगर मानांकित मयुरी ठोंबरेचे आव्हान ११-६, ११-५, ११-९ने संपवून अंतिम ८ खेळाडूंत स्थान मिळविले. सहाव्या मानांकित सलोनी शाह हिने प्रीती साळुंखेवर ११-६, ११-७, ११-७ने सहजपणे सरशी साधली.ज्युनिअर मुलांच्या गटामध्ये अव्वल मानांकित सनत जोशीने तेजस मंकेश्वर याला ११-९, ११-६, १५-१३ने नमविले. दुसºया मानांकित शौनक शिंदेने भार्गव चक्रदेव याचा प्रतिकार ११-८, १२-१०, ११-३ने संपविला. अनय कोवेलमुडीने खळबळजनक विजयाची नोंद करताना सातव्या मानांकित आदर्श गोपाळ याला स्पर्धेबाहेर केले. अनयने ही लढत ११-६, ११-९, ७-११, १४-१२ने जिंकली. तिसºया मानांकित रजत कदमने सहज विजयाची नोंद करताना आर्य शेठवर ११-७, ११-७, ११-७ने मात केली. ११वा मानांकित सनत जैन सहाव्या मानांकित रोहन खिंवसराकडून ३-११, ११-९, ९-११,२-११ने पराभूत झाला.राजत कदम याने पुरूष गटातूनही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने योगेश अग्रवाल याच्यावर ११-९,११-६, ११-९ने सरशी साधली. अव्वल मानांकित अनुराग गोटे याने अभिजीत मिठापेल्ली याच्यावर ११-७, ११-७, ११-८ने मात केली.