शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोरच तक्रारदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: August 13, 2016 05:16 IST

यवत पोलिसांनी तक्रारीची दखल घ्यावी, यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांच्या कार्यालयासमोरच तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या

यवत : यवत पोलिसांनी तक्रारीची दखल घ्यावी, यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांच्या कार्यालयासमोरच तक्रारदाराने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आज (दि. १२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल वडगुले (वय २८, रा. टाकळी भीमा, ता. दौंड) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केले.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार : आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विठ्ठल वडगुले याचे भाऊ सोपान वडगुले यांची एकाने फसवणूक केली होती. त्याबाबत फसवणुकीचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. आरोपी जयवंत ऊर्फ काळुराम नारायण वडगुले याने राहू येथील यूको बँकेतून सोपान वडगुले यांच्या बचत खात्यातून ९ लाख २१ हजार बनावट पासबुक व सहीचा वापर करून काढली होती. फसवणुकीच्या गन्ुह्यातील आरोपीचा जामीन सत्र न्यायालायाने फेटाळला होता. त्यानंतर गुन्ह्याचे फिर्यादी सोपान वडगुले यांनी आरोपीच्याविरोधात गैरसमजुतीने फिर्याद दिले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर आरोपी जयवंत ऊर्फ काळुराम नारायण वडगुले याने अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी घेऊन न्यायालयाने आरोपीला ८ आॅगस्ट २०१६ रोजी जामीन मंजूरदेखील केला होता. त्यानंतर आज (दि. १२) गुन्ह्याचे फिर्यादी सोपान व त्यांचे भाऊ विठ्ठल यांच्यात फिर्यादी सोपान याने आरोपी जयवंत यांच्याकडून फिर्याद मागे घेण्यासाठी ५ लाख रुपये लाच घेतल्याच्या कारणावरून वाद झाले. माघार घेण्यासाठी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्यामधून विठ्ठल याला भाऊ निम्मे पैसे देत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. यावरून तक्रार पोलीस ठाण्यामध्ये गेली. यावरून संबंधित परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हेदेखील आज दाखल करण्यात आले. मात्र परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर विठ्ठल वडगुले बाहेर गेला आणि काही वेळाने पोलीस ठाण्याच्या आवारात येत असताना हातात लालसर रंगाचा टीन घेऊन मोठ्याने आरडाओरडा करीत साहेब सोपान याला सोडू नका त्याने फसविले आहे. आता मी जगत नाही, असे म्हणत त्याने विष प्राशन केले. पोलिसांनी विठ्ठल याला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याने विष पिले होते. पोलिसांनी तातडीने त्याला यवत येथील आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटना घडल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करणारा विठ्ठल वडगुले याचा भाऊ सोपान वडगुले, भाचे नवनाथ मेमाणे, आनंदा मेमाणे, अनिल मेमाणे यांनी विठ्ठल याच्या घरात जाऊन त्यास मारहाण केली व केस मागे घेण्यासाठी त्याच्यावर दडपण आणले. त्यांच्या त्रासाला कंटाळून विठ्ठल वडगुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यास परावृत्त केलेबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)