शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीपूर्ण लढतही भोवली

By admin | Updated: February 25, 2017 02:43 IST

शहरातील अनेक प्रभागांमध्ये सबंध पॅनेल निवडून येण्याचे प्रमाण अधिक असताना रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७) प्रभागात क्रॉस व्होटिंग झाले.

विश्वास खोड, पुणे पुणे : शहरातील अनेक प्रभागांमध्ये सबंध पॅनेल निवडून येण्याचे प्रमाण अधिक असताना रास्ता पेठ-रविवार पेठ (प्रभाग १७) प्रभागात क्रॉस व्होटिंग झाले. राष्ट्रवादीचे २, शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी १ उमेदवार या प्रभागाने पालिकेवर पाठविले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना ३ गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्याने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा एका गटामध्ये भाजपाला तर दुसऱ्या गटामध्ये शिवसेनेला झाला. अ गटासाठी मागासवर्गीय महिला, ब साठी सर्वसाधारण महिला, आणि क व ड गट खुल्या प्रवर्गासाठी असे आरक्षण होते. त्यामुळे अ गटामधून राष्ट्रवादीच्या लक्ष्मी उदयकांत आंदेकर, ब गटामधून सुलोचना तेजेंद्र कोंढरे, क गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर आणि ड गटामधून शिवसेनेचे विशाल धनवडे निवडून आले. क गटामध्ये एमआयएम, बसपा, मनसे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे ६ उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसशी मैत्रीपूर्ण लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर यांनी बाजी मारली. या गटामध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा तोटा राष्ट्रवादीला झाला नाही. आंदेकरांनी वर्चस्व सलग राखण्यात यश मिळविले. लक्ष्मी आणि वनराज यांचे पुतण्या-चुलतीचे नाते आहे. वनराज यांना रोखण्यासाठी भाजपाने तोडीस तोड उमेश चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने या प्रभागात कांटे की टक्कर होती. मात्र चव्हाण यांना अपेक्षित मते मिळविण्यात अपयश आले.ड गटामध्येही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत झाली. येथेही दोन्ही काँग्रेसच्या मतांची बेरीज विजयी उमेदवारापेक्षा अधिक होते. शिवसेनेचे विशाल धनवडे यांना १२,४२३, राष्ट्रवादीचे सागर पवार यांना ७५१४ मते मिळाली, काँग्रेसचे राजू ऊर्फ समीर शेख यांना ५९८५ मते मिळाली. मराठा मोर्चानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारालाच संधी देण्याच्या मागणीचा काहीसा परिणाम होऊन ड गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मते कमी झाल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जाते. राष्ट्रवादीवरच्या नाराजीचा फायदा शिवसेनेला झाला. भाजपाचे अरविंद कोठारी यांना २६६ मतांनी पराभव पत्करावा लागला.