शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवासाचा फज्जा

By admin | Updated: December 27, 2016 03:22 IST

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत बसप्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेने प्रशासनाकडे दिला होता. पिंपरी-चिंचवड

पिंपरी : प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुणेकरांना मोफत बसप्रवास उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेने प्रशासनाकडे दिला होता. पिंपरी-चिंचवड पालिकेकडूनही अशा प्रकारचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाकडे जाणे गरजेचे होते. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे संबंधित प्रस्ताव पीएमपीकडे पाठविलाच गेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांंना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, नागरिकांनी दुचाकींचा वापर न करता जास्तीत जास्त बसमधून प्रवास करावा, यासाठी पुणेकरांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने १ कोटी ७० लाख रुपये पीएमपीला देणार आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातून कामानिमित्त पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. त्यातच पीएमपीचे तिकीट दरही परवडण्यासारखे राहिले नाहीत.तसेच शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण अहवालावरून शहरातील वाढते प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘एक दिवस मोफत प्रवास’सारखी योजना सुरू केली होती. (प्रतिनिधी) पीएमपी : पुण्यातही योजनेचा बोजवारा‘एक दिवस मोफत प्रवास’ योजनेची घोषणा पुणे महापालिकेने केली. आजपासून ही योजना सुरू होईल, अशी अपेक्षा पुणेकरांना होती. प्रवाशांनी प्रत्यक्षात प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा मात्र त्यांना वेगळाच अनुभव आला. बसने प्रवास क रणाऱ्या सर्व प्रवाशांकडून तिकीट घेतले जात होते. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. वाहकाकडे विचारणा केली असता, ही योजनाच सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले. योजनेच्या या गोंधळामुळे मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.पालिका प्रशासनाने घोषणा केली. मात्र, ही योजना प्रत्यक्षात सुरू कधी होणार, याचे नियोजन केले नाही. त्यामुळे बसने रोज प्रवास करणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.- निकिता शेंडगे, पीएमपी प्रवासी