शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यांवरून मुक्तप्रवास! चालकांमध्ये समाधान

By admin | Updated: November 17, 2016 02:37 IST

नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत.

राजगुरुनगर : नोटबंदीच्या निर्णयानंतर सध्या टोलनाक्यांवर टोलवसुली बंद असल्याने वाहने विनाअडथळा धावत असून टोलनाक्याजवळ होणारा वाहतूकखोळंबा थांबल्याने चालक समाधान व्यक्त करीत आहेत. राजगुरूनगरच्या चांडोली टोलनाक्यावर त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे चित्र दिसत होते. येत्या १८ तारखेपर्यंत आम्हाला कुठल्याही वाहनांकडून टोल घेऊ नयेत अशा आमच्या व्यवस्थापनाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही फक्त कामावर हजर आहोत, पण टोलवसुली बंद आहे, असे आयआरबी कंपनीच्या चांडोली टोलनाक्याचे सहव्यवस्थापक नानासाहेब गायकवाड यांनी सांगितले. टोलवसुली नसल्याने वाहने या ठिकाणाहून मुक्तपणे जा-ये करीत होती. त्यामुळे टोलनाक्यावर नेहमी दिसणारे वाहने खोळंबल्याचे चित्र सध्या दिसत नाही. टोलनाक्यावरील टोलवसुली करणारी मुले त्यामुळे सक्तीची विश्रांती घेताना दिसत होती. मात्र टोलनाक्यावर थांबून हार, गजरा विकणारे विक्रेते केविलवाणे दिसत होते. ते हातातला हार दाखवून गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होते, पण टोलमुक्तीचा आनंद घेणारे वाहनचालक थांबत नव्हते. नाक्यावर थांबावे लागत नसल्याने आज हायसे वाटत आहे, असे एक वाहनचालक सुदाम थिगळे यांनी सांगितले. टोल भरण्यापेक्षा टोलनाक्यावर होणारी वाहतूककोंडी. कटकटी, वादावादी नको वाटते, असे ते म्हणाले. टोलनाका सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच विनाटोल जाणारी वाहने मी पाहत आहे. यापूर्वी एकदा मनसेचे आंदोलन झाले तेव्हा एक दिवस काही वेळासाठी टोल बंद होता. मध्यंतरी मराठा मोर्चाच्यावेळी एक दिवस काही वाहनांना सूट होती. पण आताएवढी मुक्त वाहतूक पहिल्यांदाच होत आहे, असे येथे जवळच नर्सरीचा व्यवसाय करणारे राजेश घुमटकर यांनी सांगितले. वाहन खरेदी करतानाच एकरकमी टोल घेतला गेला तर हि रोजची अडवणूक कमी होऊ शकेल अशी प्रतिक्रिया एका वाहनचालकाने व्यक्त केली. (वार्ताहर)