शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूड शिवसृष्टीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: January 9, 2017 03:13 IST

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये

पुणे : कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) या जागेवर महापालिकेच्या प्रकल्पासाठी राखीव असे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर या जागेवर प्रस्तावित असलेला मेट्रोचा डेपो कल्याणीनगर येथे हलविण्यात आला आहे. कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी व्हावी, असा ठराव मुख्य सभेच्या वतीने मंजूर केला होता, तर दुसरीकडे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने बनविलेल्या आराखड्यानुसार मेट्रोचा डेपो या ठिकाणी दाखविण्यात आला होता. त्यामुळे शिवसृष्टीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मेट्रोचा डेपोच कल्याणीनगर येथे हलविण्यात आल्याने हा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो वनाझ ते रामवाडी या मार्गावरून धावणार आहे. शिवसृष्टीच्या जागेचा तिढा निकाली निघाल्याने आगामी महापालिका निवडणुकांनंतर या शिवसृष्टीच्या कामाला वेग येऊ शकतो. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत भावनिक अशा मुद्द्यांवर शासनाने मोठ्या शिताफीने मार्ग काढला आहे. कोथरूडच्या जागेवर मेट्रो डेपोचा निर्णय झाला असता, तर शिवसृष्टीला शासनाने रेड सिग्नल दाखविला, अशी टीका झाली असती. शहराच्या डीपीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. डीपीमधील ८५० आरक्षणांमध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. राज्य सरकारने केलेले बदल ते अंतिम असणार आहेत. नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवून घेण्यात येणारा निर्णय यामध्ये एकूण २३५ आरक्षणे आहेत, तर ४१५ आरक्षणांवर निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसृष्टी या पुणे महापालिकेच्या प्रकल्पाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचा जीवनपट येथे शिल्पांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर संग्रहालय, हॉटेल, पार्किंग, मनोरंजन उद्यान, तसेच शिवाजीमहाराजांचा संपूर्ण इतिहासाची मांडणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी शिवसृष्टीसाठी तरतूद केली जात होती. मात्र प्रकल्पाला राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळत नसल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नव्हते.