शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २०० ठिकाणांवर मिळणार मोफत इंटरनेट

By admin | Updated: January 2, 2017 02:35 IST

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुणे : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणांवरून अर्ध्या तासामध्ये ५० एमबीपर्यंत इंटरनेट मिळू शकणार आहे. प्रमुख पर्यटनस्थळे, बसथांबे, बगीचे, हॉस्पिटल आदी सार्वजनिक ठिकाणांवर ही वाय-फाय सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाइलवर इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे ही मूलभूत गरज झाली आहे. कॅशलेस व्यवस्थेचा पुरस्कार करताना मोबाइल बँकिंग व व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे, त्यासाठी इंटरनेट ही निकडीची गरज ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकांवर मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर मोफत इंटरनेट देण्याचा उपक्रम राबविला होता. आता पालिकेच्या वतीनेच वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे.शहराला मोफत इंटरनेटसह वाय-फायसह इमर्जन्सी बॉक्स, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम, व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले आणि एन्व्हायर्नमेंटल सेन्सर्स आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १४० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या सेवांचे कंट्रोल बाणेर येथील अद्यवयात नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. सुरक्षा-आपत्कालीन स्थितीत अत्यंत कमी वेळात संपर्क साधता यावा, यासाठीची एक यंत्रणा उभारली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या संदेशांचे फलक शहरात ठिकठिकाणी बसविले जाणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मोफत इंटरनेटबरोबरच इतरही महत्त्वपूर्ण सुविधा दिल्या जाणार आहेत. शहराचे पर्यावरण सुस्थितीत राहावे यासाठी विविध ५० ठिकाणी इन्व्हायरन्मेंट मॉनिटरिंग सिस्टिम बसविल्या जाणार आहेत. तापमान, हवेची गुणवत्ता, ध्वनिप्रदूषण आदींचा अभ्यास या सिस्टीमद्वारे केला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची अचूक माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरात १२५ ठिकाणी महत्त्वाचे संदेश देण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. आत्पकालीन परिस्थितीमध्ये तसेच आवश्यक त्या सूचना देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. विशेषत: पोलिसांना याचा खूपच उपयोग होऊ शकेल. आपद्कालीन प्रतिसाद यंत्रणेद्वारे नागरिकांना कमीत कमी वेळात मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)