शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

लष्करात भरती करण्याचे सांगून ६० लाखांची फसवणूक,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्करात अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईला फसवून लग्न केले. पत्नीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्करात अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईला फसवून लग्न केले. पत्नीच्या भावाला लष्करात भरती करतो, असे सांगून २ लाख रुपयांना लुबाडले. तसेच, त्यांच्या गावाकडील तरुणांना बनावट भरतीचे पत्र देऊन ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी योगेश दत्तू गायकवाड (रा. किशोरे, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आळंदी येथील एका २१ वर्षांच्या महिलने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडीत जानेवारी २०२० मध्ये घडला होता. फिर्यादी यांच्या आईला रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने त्यांना बिबवेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. प्राथमिक उचार करून त्या हॉस्पिटलसमोर रिक्षाची वाट पाहात होत्या. त्या वेळी योगेश गायकवाड तेथून जात असताना त्याच्या पँटच्या खिशातून आधार कार्ड पडले. ते फिर्यादी यांनी पाहिल्यावर ते देण्यासाठी त्यांनी आवाज दिला. आरोपीने त्यांच्याशी जवळीक साधून तो लष्करात अधिकारी असल्याचे सांगितले. लष्कराच्या गणवेशातील फोटो, बनावट आयकार्ड दाखवून फिर्यादी यांच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना खोटे बोलून त्यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना लष्करात मोठी भरती निघाल्याचे सांगितले. मुले भरण्यासाठी फिर्यादी यांच्या वडिलांकडून फिर्यादी यांच्या भावास भरती करण्यासाठी २ लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांच्या गावातील व बाहेरील गावातील मुलांचा विश्वास संपादन करून त्यांना लष्करामध्ये भरती करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० ते ६० लाख रुपये घेतले. त्यांना लष्करात भरती झाल्याबाबत बनावट भरती पत्र देऊन त्यांची फसवणूक केली़.

आरोपीविरुद्ध अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. उसगावकर यांनी सांगितले की, आरोपीने फसवणूक केल्याचे फिर्यादीसह १० जणांच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. आरोपींने त्यांच्यापैकी काही जणांकडून १ ते ३ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले आहेत. आरोपीने जवळपास ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.