शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीच्या बहाण्याने ४० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून वार्षिक २४ टक्के परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून वार्षिक २४ टक्के परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली.

समीर शौकत इनामदार (शेख) (रा. वारजे, मूळ गाव परळी, ता. जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी गणेश बडवे, गौरीहर भागवत आणि रश्मी शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रितेश चंद्रकांत बाबेल (वय ४२, रा. सॅलसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ मार्च २०१७ ते १३ मार्च २०१८ दरम्यान घडला आहे. बाबेल यांचा इनामदार यांच्याशी परिचय झाला होता. इनामदार हे ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनवून घेऊन ते विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार बाबेल यांनी सुरुवातीला २५ लाख रुपये दिले. वेळोवेळी पैसे गुंतविले. एकूण ४० लाख व १०० ग्रॅम सोने इनामदारकडे दिले.

फिर्यादी यांची मर्सिडीज कार विकायची असल्याचे इनामदार व गौरीहर यांना समजल्यावर त्यांनी ती खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन गाडी व तिची कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना पैसे दिले नाही. खटाव येथील जमीन व वारजे येथील फ्लॅट देण्याचे कबूल केले. फिर्यादीने फ्लॅटची कागदपत्रे पाहिली. तेव्हा ती बनावट असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी चौघांविरुद्ध फिर्याद दिली.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस.बी. जायभाय यांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादीची अलिशान गाडी गणेश बडवे यांना विकली असून त्याबाबतच्या कागदपत्रावर परस्पर सह्या केल्या आहेत. आरोपीने मुंबईतील व्यापाऱ्यास २४ लाख रुपये दिल्याचे तपासात कबुली दिली आहे. तसेच ७ लाख रुपये फिर्यादीच्या खात्यावर जमा केले. समीर व गौरीहर भागवत यांनी फिर्यादीच्या रकमेतून वारजे येथील वनिता प्लाझा येथे २ फ्लॅट खरेदी केले आहेत. फिर्यादी यांचे २३०० ग्रॅम सोने आणि अलिशान कारचा अपहार केला आहे. न्यायालयाने तपासासाठी समीर इनामदार याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.