समीर शौकत इनामदार शेख (वय ३५,रा. वारजे, मूळ- परळी, सातारा), रश्मी समीर इमानदार (वय ३०), गौरीहर हनुमंत भागवत (वय २९, रा. सातारा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रीतेश बाबेल (वय ४२, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी प्रीतेश आणि समीर यांची ओळख आहे. या ओळखीतून समीरने प्रीतेशला सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून २३०० ग्रॅम सोने ताब्यात घेतले. त्याशिवाय समीरने प्रीतेशकडून अलिशान मोटार खरेदी करून व्यवसायातून होणाऱ्या फायद्यातून मोटारीची रक्कम देण्याचे कबूल केले. मात्र प्रीतेशने विश्वास ठेवून समीरकडून रक्कम न घेता अलिशान मोटार ताब्यात दिली. त्यानंतर वारंवार पैसे मागूनही समीरने सोने आणि मोटारीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करीत आहेत.