शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीला मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:45 IST

गर्दीने फुललेली शहरातील हॉटेल, मॉल आणि बागा... रंगीबेरंगी बँडनी सजलेले हात... सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा शुभेच्छांचा वर्षाव... अनेक वर्षांनी भेट झाल्याने रंगलेल्या गप्पा, अशा उत्साही आणि ताज्यातवान्या वातावरणात फ्रेंडशिप डे साजरा झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गर्दीने फुललेली शहरातील हॉटेल, मॉल आणि बागा... रंगीबेरंगी बँडनी सजलेले हात... सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा शुभेच्छांचा वर्षाव... अनेक वर्षांनी भेट झाल्याने रंगलेल्या गप्पा, अशा उत्साही आणि ताज्यातवान्या वातावरणात फ्रेंडशिप डे साजरा झाला.रविवारची सुट्टी आणि त्यात पावसाने घेतलेली रजा यामुळे मित्र-मैत्रिणींचे चमू कॅम्प, एफ. सी. रस्ता, जे. एम. रस्ता, एम. जी. रस्ता आदी ठिकाणी मनसोक्त बागडताना दिसले. फ्रेंडशिप बँड बांधून, भेटवस्तू देऊन मैत्रीदिनाची शोभा अनेक पटींनी वाढली.मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे. आपल्या सख्या-सुहृदांना शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा केला जातो. ‘फ्रेंडशिप डे’ हा दिवस तारखेनुसार नाही तर, दिवसानुसार साजरा केला जातो. दरवर्षीच्या आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी जी तारीख असेल त्या तारखेला त्या वर्षीचा ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.शहरातील विविध ठिकाणाप्रमाणेच सोशल मीडियावरील कट्ट्यांवरही मैत्रीच्या गप्पा रंगल्या. दिवसभरात मैत्री दिनाच्या शुभेच्छांमुळे एक प्रकारे मैत्रीचा जागर झाला. खरंच आहे मित्रांशिवाय जीवनाचा अर्थ शून्य! जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि वळणावर आपणापैकी काही मित्रांची साथ लाभली नसती तर आजवरची वाटचाल अशक्यप्राय अशीच होती. त्यामुळे हे असे मित्र खरंच केवळ आपल्या जीवनाचा ठेवाच नाही तर पुढे मार्गक्रमण करण्याची शक्तीच आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मनातील भावनांना वाट मिळाली.मैत्रीदिनाच्या खूप शुभेच्छा... तुमच्यासारख्या लोकांमुळे आयुष्याला अर्थ आला.. असेच कायम सोबत रहा‘मैत्री’ नसावी मुसळधार पावसासारखी,एकदाच बरसून थांबणारी..‘मैत्री’ असावी रिमझिम सरीसारखी,मनाला सुखद गारवा देणारी‘मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’मी तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवू शकेन का.. हे मला माहीत नाही... पण तुमच्या अडचणीत मी तुम्हाला एकट सोडणार नाही हे नक्की.अशा शुभेच्छांचा वर्षाव झाला. शाळेत, महाविद्यालयात मैत्रीदिनाच्या दिवशी एकमेकांना आवर्जून भेटणारे मित्र-मैत्रिणी कामाच्या व्यापामुळे प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत. अशा वेळी फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.