शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालघनने डोक्यात वार केल्याने कवटीला फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:14 IST

सोसायटीच्या दरवाजात गळाभेट घेऊन त्यानंतर दोघांनी एकाच्या डोक्यात पालघनने वार केला़

पुणे : सोसायटीच्या दरवाजात गळाभेट घेऊन त्यानंतर दोघांनी एकाच्या डोक्यात पालघनने वार केला़ हा वार इतका भीषण होता की त्यामुळे त्याच्या डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी आहे़ सचिन बाळासाहेब जागडे (रा़ साहिल आनंद सोसायटी, कामठे पाटीलनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे़ कोंढवा पोलिसांनी शेखर लोखंडे आणि सुरेश बळीराम दयाळू (दोघे रा़ शेळकेवस्ती, अप्पर सुपर इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी रिक्षाचालक शेखर लक्ष्मण आंबवले यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना कोंढव्यातील कामठे पाटीलनगर येथील साहिल आनंद सोसायटीसमोर रविवारी मध्यरात्री एकला घडली़याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन जागडे यांनी रिक्षाचालक शेख आंबवले यांना फोन करून निवांत हॉटेल येथे बोलावून घेतले व घरी जायचे आहे, असे सांगितले़ त्याच्या मोटारसायकलवरुन ते साहिल आनंद सोसायटीच्या गेटजवळ आले़ तेव्हा त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन दोघे जण आले़ त्यांनी सचिन जागडे यांची गळाभेट घेतली व काय भाऊ काय करतो, असे विचारले़ सचिन काही बोलणार तेवढ्यात दोघांनी त्यांच्याकडील पालघनने सचिन यांच्या डोक्यात व शरीरावर सपासप वार केले़शेखर आंबवले हे त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करु लागताच त्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली़ या दोघांनी सचिन जागडे यांच्या डोक्यात इतक्या जोरात वार केले की त्यात त्यांच्या डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहे़ त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़सचिन जागडे हे बोलू शकत नसल्याने या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही़ शेखर लोखंडे व सुरेश दयाळू हे पळून गेले असून कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत़