शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बाह्यवळण की चौपदरीकरण?

By admin | Updated: December 29, 2014 23:20 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत.

निनाद देशमुख ल्ल पुणे पुणे-नाशिक महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणासाठी एकीकडे भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच महामार्गाच्या रुंदीरकण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहेत. यामुळे मूळ रस्त्याचे चौपदरीकरण होणार, की बाह्यवळण या संभ्रमात येथील शेतकरी आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर चौक, खेड घाट, पेठ घाट, अवसरी घाट, मंचर, कळंब, नारायणगाव बसस्थानक, तसेच आळेफाट्याजवळील कुकडी नदीवरच्या अरुंद पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी व जलद वाहतुकीसाठी खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांत बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकीकडे जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर शिक्के मारले जात आहे. त्याचबरोबर आहे त्या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडे तोडली जात आहे. यामुळे बाह्यवळण होणार की चौपदरीकरण याबाबतची संभ्रमावस्था वाढली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि खेड या परिसरात बाह्यवळण प्रस्तावित आहे. यासाठी जमिनींचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आतापर्यंत मोजणीसाठी आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. एकीकडे गुंठ्याला ५ लाख रुपये भाव असताना ज्यांच्या जमिनी या बाह्यवळणात जात आहे, त्यांना केवळ गुंठ्याला ६० हजार रुपये भाव देण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी या प्रक्रियेमुळे भूमिहीन होणार असल्याने त्यांचाही या रस्त्याला विरोध आहे. बाह्यवळण न करता आहे त्या मार्गाचेच रुंदीकरण करण्यात यावे, अशी त्यांचीभूमिका आहे. कळंब, एकलहरे परिसरातील मोठ्या प्रमाणात झाले रस्ता रुंदीकरणासाठी तोडली जात आहे. या झाडांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. शेतकऱ्यांचा बाह्यवळणाला विरोध आहे. शासनाने आहे त्या रस्त्याचे रुंदीकरण करावे. असे झाल्यास काही प्रमाणात जमिनी जातील, तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्नही सुटेल. प्रभाकर बांगर अध्यक्ष, शेतकरी बचाव कृती समितीजुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात अनेक प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत. आता परत या रस्त्यासाठी जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहे. भविष्यातही रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहीत होतील. यामुळे शेतकऱ्यांची जमिनी देण्याची मानसिकता नाही. - महेश शिंदे शेतकरी, नारायणगाव४केंद्र शासनाने या रस्त्याचे काम पुणे-नाशिक महामार्ग विभाग क्र. ६२ कडून काढून घेतले आहे. ते केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या विभागाने चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेली सर्व मोठी झाडे तोडण्यात आली आहे. ४मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी ज्या ज्या ठिकाणी बाह्यवळण आहे, त्या त्या ठिकाणी जागांचा ताबा अद्याप घेतलेला नाही़ पुणे-नाशिक महामार्गावरील खेड, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा या पाच गावांमध्ये बाह्यवळण प्रस्तावित आहे. नगर जिल्ह्यातील बोटा आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे या गावांमध्ये बाह्यवळण (बायपास) करण्यात येणार आहे़ खेड ते सिन्नर असे १३५ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे़ हे काम २०१६पर्यंत होणे अपेक्षित आहे. या चौपदरीकरणाच्या दरम्यान चाळकवाडी व संगमनेरजवळ असे दोन टोलनाके उभारण्यात येणार आहे़दोन वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम चौपदरी एवजी सहा पदरी करण्याचा विचार असल्याचे सांगितले होते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे हा प्रस्ताव तसाच राहिला.बाह्यवळणासाठी अजून जमिनींचे भूसंपादन झालेले नाही. जोपर्यंत आम्हाला जमिनी मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला कामे करता येणार नाही. नारायणगाव ते आळाफाटादरम्यानचा रस्ता मोठा करण्यासाठी झाडे तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ती तोडली जात आहे. जवळपास १२ ते १३ किलोमीटर परिसरातील रस्ता रुंदीकरणामध्ये येणारी झाडे तोडावी लागणार आहे.- डी. एस. झोडगे, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक