शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्का

By admin | Updated: December 18, 2014 04:43 IST

जिल्ह्यामध्ये जमिनींच्या व्यवहारांसोबतच व्यावसायिकांकडून दाबून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान

पुणे : जिल्ह्यामध्ये जमिनींच्या व्यवहारांसोबतच व्यावसायिकांकडून दाबून खंडण्या उकळणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायमच राहिलेले आहे. ग्रामीण पोलिसांनी या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडून गेल्या वर्षभरात तब्बल १४ टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील पाच टोळ्यांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, मोक्का लावण्यात आलेल्या ९८ गुन्हेगारांपैकी ६९ गुन्हेगारांना गजाआड केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.रस्त्यांवरील जबरी चोऱ्या, दरोडे यांसोबतच स्थानिक गुन्हेगारीमध्ये आता बदल होऊ लागले आहेत. ‘तेलमाफियां’च्या कारवायांमुळे ग्रामीण पोलिसांच्या कायमच नाकी नऊ येत राहिलेले आहेत. देहूरोड, चाकण, तळेगाव आदी भागांतील ‘ब्लॅक आॅईल’ माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी हालचालीही केल्या होत्या. परंतु पुणे शहराची व्याप्ती झपाट्याने वाढल्यानंतर शहरालगतच्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. जागोजाग शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी विकत घेतल्या जाऊ लागल्या आहेत. या व्यवहारांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसाही खुळखुळू लागला आहे. यातूनच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले आहे. वरचढ होत चाललेल्या या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्याचा (मोक्का) कारवाईचा आधार घेतला. गेल्या अकरा महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी चौदा टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. यातील पाच टोळ्यांविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. तर, पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांनी तीन टोळ्यांचा मोक्का नाकारला. तीन टोळ्या तपासावर आहेत. जबरी चोरी, दरोडे टाकण्याऱ्यांपासून ते खून, खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांपर्यंत सर्व गुन्हेगारांना मोक्काचा लगाम घालण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी केलेली ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचेही लोहिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)