शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:13 IST

गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथे गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनीहल्ला ...

गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला

शेलपिंपळगाव : सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथे गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनीहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चाकण पोलिसांनी हल्लेखोरांना बुधवारी (दि. १८) सकाळी अटक केली आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी (दि. १७) रात्री दहाच्या सुमारास घडली. सिद्धेगव्हाण येथे गायरान जागेत वास्तव्यास असलेल्या पवार आणि भैरवकर या दोन कुटुंबांत जागेच्या हद्दीवरून वाद होता. या वादातून प्रमोद ऊर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड) यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पवार कुटुंबातील चार जणांवर धारदार तलवारीने खुनीहल्ला चढवला. या हल्ल्यात चंद्रकांत किसन पवार (वय ४२), प्रतीक चंद्रकांत पवार (वय १८), चैतन्य ऊर्फ सोन्या चंद्रकांत पवार (वय १६) व कमल चंद्रकांत पवार (वय ३९ सर्व रा. सिद्धेगव्हाण) हे गंभीर जखमी झाले आहेत.

रात्रीच्या सुमारास झालेला आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घटनेचा पंचनामा करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रमोद ऊर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड) या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा आदेश खेड न्यायालयाने सुनावला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.