पुणे : ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला असून आतापर्यंत १३ पैैकी ४ तालुके हगणदरीमुक्त करण्यात यश आले असून हवेली तालुका ३१ डिसेंबरपर्यंत होऊ शकतो. या मोहिमेला गती देण्यासाठी आता प्रशासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजनाही जाहीर केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाच्याआदेशानुसार जिल्हा हगणदरीमुक्तीची मोहीम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. १३ तालुक्यांपैैकी मुळशी तालुका यापूर्वी झाला होता. उर्वरित १२ तालुके ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने सोडला आहे. मात्र याला आता फक्त आठवडा उरला असून ते टार्गेट अशक्य आहे. मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत भोर, वेल्हा व खेड हे तीन तालुके या मोहिमेत हगणदरीमुक्त झाले आहेत. हवेली तालुका ९७.२३ टक्के झाला असून या आठवडाभरात ते टार्गेट पूर्ण होऊ शकते. या मोहिमेला गती देण्यासाठी आतापर्र्यंत प्रशासनाने विद्यार्थ्यांमार्फत शौचालय नसलेल्या लाभार्थ्याला पत्र पाठवून ते बांधण्याचे आवाहन केले. घरभेटी करून त्याचे महत्त्व पटवून दिले, भाऊबीज भेट यांसह हगणदरीमुक्त गट झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांना मानपत्र हा नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहे. तसेच १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ठराव करून ज्यांच्याकडे शौचालये नाहीत, त्यांच्या मूलभूत सुविधाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला. आता या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले होते. याला ग्रामसेवक संघटना दौैंड, खेड, शिरूर, आरोग्य कर्मचारी संघटना इंदापूर, दौैंड, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना दौंड, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कर्मचारी संघटना दौैंड, लिपिकवर्गीय संघटना दौैंड व पशुसंवर्धन विभाग दौैंड यांनी त्या त्या तालुक्यातील गावे हगणदरीमुक्तसाठी दत्तक घेतली आहेत.मानपत्र आणि बक्षीस योजनाया मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या संकल्पनेतून सुरुवातीला जो जिल्हा परिषद गट व तालुका हगणदरीमुक्त होईल त्यांना मानपत्र देण्यात येत आहे. आता लोकसहभागाद्वारे गावे हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असून यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे. या कामात व्यापक स्वरूप देऊन सर्व घटकांचा स्वच्छ भारत मिशन कामात सहभाग वाढावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ५१ कुटुंबांपेक्षा जास्त शौचालये राहिलेली गावे दत्तक घेऊन तिथे शौचालये बांधणाऱ्यास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
चार तालुके हगणदरीमुक्त
By admin | Updated: December 26, 2016 02:47 IST