शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढणार आणखी चार कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत चाललेला आकडा पाहता प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. अलगीकरण तसेच बाधित रुग्णांसाठी ...

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत चाललेला आकडा पाहता प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. अलगीकरण तसेच बाधित रुग्णांसाठी खाटांची सुविधा वाढविण्यास सुरुवात केली आहे. शहरात आणखी चार ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली जाणार आहेत.

गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख खाली गेला होता. जानेवारीमध्ये दिवसाकाठी १०० ते १५० रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून अचानक रुग्णवाढ सुरु झाली. मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात हा आकडा दिवसाला दोन हजार रुग्ण इथपर्यंत पोचला आहे.

खासगी रुग्णालयातील आरक्षित खाटा उपलब्ध होत नाहीयेत. बाधित नागरिकांना घरामध्ये अलगीकरणात राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांच्यासाठी खाटांची उपलब्धता करणे आवश्यक आहे. पालिकेने रक्षकनगर येथील २०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तसेच आता बाणेर येथे नंदन अ‍ॅक्युरा (३०० खाटा), हडपसरमधील बनकर शाळा (३०० खाटा), खराडी येथील पठारे स्टेडीयम (३०० खाटा) तर येरवडा येथील संत ज्ञानेश्वर हॉस्टेल (३५० खाटा) तयार ठेवणार आहेत. त्यासाठीची जबाबदारी संबधित क्षेत्रीय कार्यालयांवर दिली असून त्यासाठी आवश्यक असलेले साहित्य भवन विभागाकडून घेतले जाणार आहे. या ठिकाणी स्वच्छता व्यवस्था, कर्मचारी तसेच इतर सुविधा तातडीनं उभारण्याचे आदेश दिले आहेत.