शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात चार दिवस पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बिहार ते दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमीदाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे यापुढील ४ दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बिहार ते दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमीदाबाचे क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे यापुढील ४ दिवस राज्यात कोकणासह सर्वत्र वादळी वाऱ्र्यासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

गेल्या २४ तासांत सातारा येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सोमवारी दिवसभरात सातारा येथे ४ मिमी पाऊस झाला आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ ते ३० एप्रिल दरम्यान तसेच रायगड जिल्ह्यात २९ व ३० एप्रिल रोजी वादळी वाऱ्र्यासह पावसाची शक्यता आहे.

पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान वादळी वारे व मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २७ ते ३० एप्रिल दरम्यान जोरदार वारे, वीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात २८, २९ व ३० एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात २९ व ३० एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

....

पुण्यात पावसाचा शिडकावा

शहरात सोमवारी सायंकाळी काही भागात तुरळक पाऊस झाला. प्रामुख्याने शहराच्या पश्चिम भागातील काही उपनगरांमध्ये पाऊस झाला. आज दिवसभर आकाश अंशत: ढगाळ होते. दुपारनंतर वीजांच्या कडकडाट होताना दिसत होता. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी शिडकावा झाला तर काही ठिकाणी हलकी सर येऊन गेली. शिवणे परिसरात सुमारे अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. सिंहगड रोड परिसर, कर्वेरोड, कर्वेनगर, शिवाजीनगर भागात तुरळक पाऊस झाला. शहराच्या पूर्व भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली.

पुढील चार दिवस शहरात आकाश अंशत: ढगाळ राहून सायंकाळी विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.