शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांच्या सुट्या, काम आज दुपारपासूनच बंद

By admin | Updated: December 24, 2015 00:54 IST

सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या, पण तरीही महापालिकेच्या बहुसंख्य कार्यालयांतील कामकाज आज (बुधवार) दुपारपासूनच मंदावले होते.

पुणे : सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या, पण तरीही महापालिकेच्या बहुसंख्य कार्यालयांतील कामकाज आज (बुधवार) दुपारपासूनच मंदावले होते. अनेकांनी तर फायली बंद करून कामासाठी आलेल्यांना आता सोमवारीच या, असा सल्ला देण्यास दुपारी ३ नंतरच सुरुवात केली होती. सगळी पालिकाच दुपारी ३ नंतर सुस्तावलेली दिसत होती.उद्या (गुरुवार) पैगंबर जयंती, शुक्रवारी नाताळ त्यानंतर चौथा शनिवार व रविवारी साप्ताहिक सुटी अशा सलग ४ दिवसांच्या सुट्या महापालिकेला मिळाल्या आहेत. त्यामुळे आज पूर्ण क्षमतेने काम सुरू असेल असाच कोणाचाही समज होईल, प्रत्यक्षातील स्थिती मात्र पूर्ण वेगळी होती. आज दुपारपासूनच अनेक विभागांमधील बहुसंख्य कर्मचारी सुटीच्या मूडमध्ये गेले होते. विविध विभागांची कार्यालये सुरू झाल्यानंतर काही वेळ दैनंदिन काम झाले, नंतर मात्र सगळीकडे सुट्यांचीच चर्चा होती. काही जण तर दुपारी ३ नंतरच टेबलवरच्या फायली बंद करून घड्याळाकडे नजर लावून बसलेले दिसत होते.पालिकेशी संबंधित कामांसाठी अनेक नागरिक दिवसभर मुख्य इमारतीत येत असतात. त्यातील दुपारनंतर आलेल्या बहुतेकांना आता सोमवारीच या, असा सल्ला ऐकायला मिळाला. साहेब व्हिजिटला गेले आहेत, साहेबांकडे गेले आहेत, त्यांना यायला उशीर होईल, आता येतील असे वाटत नाही, अशीच उत्तरे ऐकायला मिळत होती. पालिकेच्या मुख्य इमारतीच्या कार्यालयांमध्ये असलेली भलीमोठी लॉबी एरवी नेहमीच गजबजलेली असते. आज मात्र गर्दी दिसत नव्हती. कार्यालयांमध्ये डोकावून पाहिले असता रिकाम्या खुर्च्यांचीच संख्या जास्त दिसत होती. साहेबही नाही व कर्मचारीही कामाच्या मूडमध्ये नसल्यासारखे. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पालिकेचे कॅन्टिन आहे. तिथे चहा व काही मोजकेच खाद्यपदार्थ मिळतात. दुपारनंतर या कॅन्टिनमधील सगळे खाद्यपदार्थ संपले होते व फक्त चहा शिल्लक होता. आज विशेष आॅर्डर नसते, त्यामुळे माल कमीच केला होता, असे कॅन्टिन संचालकाने सांगितले. (प्रतिनिधी)