शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांची चार बछडी सापडली

By admin | Updated: May 4, 2015 02:50 IST

शिवरातील डेरे मळ्यातील एका शेतात २ महिन्यांची बिबट्याची ४ बछडी सापडली आहेत. उसाचे पाचट पेटवून दिल्याने बछड्यांपैकी २ बछडी गंभीररित्या जखमी झाली आहेत.

नारायणगाव : शिवरातील डेरे मळ्यातील एका शेतात २ महिन्यांची बिबट्याची ४ बछडी सापडली आहेत. उसाचे पाचट पेटवून दिल्याने बछड्यांपैकी २ बछडी गंभीररित्या जखमी झाली आहेत. जखमी बछड्यांना माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे, अशी माहिती नारायणगाव वन विभागाचे वन क्षेत्रपाल एस. एन. बनसोडे व डॉ. अजित देशमुख यांनी दिली.शेतकरी एकनाथ बाबुराव तांबे यांच्या सर्वे क्रमांक ७८ मध्ये रविवार (दि.३) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे बछडे आढळून आले. कामगार ऊस तोडण्यासाठी तांबे यांच्याकडे आले होते. त्यांनी ऊस तोडणीसाठी काही ठिकाणी असलेले उसाचे पाचट पेटवून दिले. त्यावेळी उसात एक मादी बिबट्या व तिचे ४ बछडे होते.आग लागल्याने बिबट्या मादीने तेथे असलेले कामगार भाऊसाहेब केदार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र आग वाढल्याने केदार हे बचावले गेले आणि आगीच्या भितीने बिबट्या मादी ४ बछड्याना सोडून पळून गेली. आगीच्या लोळामुळे २ बछडे गंभीररित्या जखमी झाले, तर अन्य २ बछडे किरकोळ जखमी झाले.बिबट्याची बछडी असल्याची माहिती तेथील कामगार भाऊसाहेब केदार, एकनाथ तांबे, अ‍ॅड. शिवदास तांबे यांना मिळाली. त्यांनी या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी नेले आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी नारायणगावचे वनक्षेत्रपाल एस. एन. बनसोडे, एम. जे. काळे, माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित देशमुख, डॉ. महेश ढोरे, एल. बी. शेलार यांनी घटनास्थळी येऊन या ४ बछड्यांना ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात नेले. दरम्यान, नारायणगाव परिसरात सुमारे एक वर्षापासून २ बिबट्यांचा संचार आहे. याची माहिती ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागाला दिलेली आहे. या २ बिबट्यांची या परिसरात दहशत असून त्यांनी परिसरातील सर्व पाळीव कुत्री व इतर जनावरे फस्त केली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात सुमारे २० ते ३० मोर असल्याने या ठिकाणी काही शिकारी रात्रीच्या वेळी येऊन त्यांची शिकार करतात. त्याकडे देखील वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, असे अ‍ॅड. शिवदास तांबे व एकनाथ तांबे यांनी सांगितले.