पुणो : एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणातील माजी न्यायाधीशाची मंगळवारी ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी सरकारी वकिलांना आपले म्हणणो सादर करण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात 14 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
माजी न्यायाधीश नागराज सुदाम शिंदे (वय 38, रा. कात्रज) असे या आरोपीचे नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी 1क् नोव्हेंबर रोजी शिंदे न्यायालयात रुग्णवाहिकेतून शरण आला होता. त्याचा अपघात झाल्याने उजव्या पायाची शस्त्रक्रिया झाली असून, उजवा पाय प्लॅस्टरमध्ये आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी सुनावली व उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ससूनमध्ये हलविण्यात आले आहे.
शिंदे याची प}ी बाहेरगावी गेली असताना शेजारी राहणारी मुलगी कॅरम खेळण्यासाठी म्हणून गेली असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.
(प्रतिनिधी)
4मंगळवारी रुग्णालयाने शिंदेवर उपचार न करता, त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली. त्यामुळे आरोपीचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर यांनी आरोपीला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्याची सूचना कारागृह अधिका:यांना देण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात केला आहे.
4या अर्जानुसार, आरोपीवर कोणतेही उपचार केलेले नाहीत. त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून, त्याला पायही हलवता येत नाही. त्याला सातत्याने वैद्यकीय उपचाराची आवश्यकता आहे आणि ही सुविधा येरवडा कारागृहात उपलब्ध नाही. त्यामुळे शिंदेला पुन्हा ससून रुग्णालयात हलविण्यासंदर्भात कारगृह अधिका:यांना निर्देश देण्यात यावे, असे अर्जात नमूद केले आहे. न्यायालयाने यावर सरकारी वकिलांचे म्हणणो सादर करण्याचा आदेश दिला.