शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माजी कृषी परिषद महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST

पुणे: चॉकलेट आणि खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ...

पुणे: चॉकलेट आणि खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही अदाने यांनी हा आदेश दिला.

मारुती हरी सावंत (वय ६५) असे कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचे नाव आहे. सावंत याला २०१५ मधील बाललैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्याने अर्ज केला होता.

लहान मुलींना चॉकलेट, खाऊचे आमिष दाखवून त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार केले. तसेच अश्‍लील व्हीडिओ दाखवून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य त्यांनी केले.

सावंत यांच्या घरझडतीत सीडी, हार्ड डिक्स जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे साडेतीन हजार अश्‍लील व्हिडिओ मिळून आले होते. तसेच २० लिटर दारूची बाटली जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या खटल्यात १४ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. कोरोना महामारी तसेच वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्याच्या कारणावरून व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या १२ मे २०१९च्या शिफारसीला अनुसरून तात्पुरता जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी विरोध केला. आरोपीचा अर्ज हा उच्च अधिकारी समितीच्या शिफारसीस अनुसरून नाही. आरोपी हा उच्च पदस्थ असल्याने व हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद ॲड. परदेशी यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.