शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी येत नाही अन् बोलणार पण नाही" असं म्हणणाऱ्या भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा भाजपात प्रवेश
2
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
3
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
4
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
5
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
6
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन
7
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
8
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
9
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
10
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
11
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
12
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
13
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
14
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
15
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
16
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
17
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
18
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
19
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
20
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर

By admin | Updated: October 7, 2014 06:58 IST

मालमत्ता विद्रूपीकरण कायद्यानुसार खासगी, सरकारी जागेवरील राजकीय कार्यकर्त्यांचा उल्लेख असलेले छोटे-मोठे

पुणे : मालमत्ता विद्रूपीकरण कायद्यानुसार खासगी, सरकारी जागेवरील राजकीय कार्यकर्त्यांचा उल्लेख असलेले छोटे-मोठे विनापरवाना नामफलक काढण्याची किंंवा ते झाकण्याची कार्यवाही शहरात सर्वत्र बारकाईने झालेली नाही. वाहनांवरही पक्ष चिन्हासह कार्यकर्त्यांची नावे झळकत आहेत. फ्लेक्स बोर्ड किंंवा बॅनरपुरती ही कारवाई मर्यादित राहिल्याने उमेदवाराच्या छबीसह अनेकांचे फलक सर्रास दिसून येत आहेत.आचारसंहिता जाहीर होताच विनापरवाना फ्लेक्स बोर्ड किंंवा बॅनर एका रात्रीत काढले गेले. मात्र चौक, रस्ते, उद्याने, सार्वजनिक मंडळे या ठिकाणचे छोटे फलक कायम आहेत. नगरसेवक किंंवा काही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी आपापल्या भागांत चौकांमध्ये, गजबजलेल्या रस्त्यांवर नामफलक उभारले आहेत. महापालिकेने उभारलेल्या रस्तेदर्शक फलकांवर किंंवा अन्य ठिकाणच्या फलकांवर सौजन्य म्हणून नगरसेवकांची नावे झळकली आहेत. काही सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या फलकांवर राजकीय नेत्यांची छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत.धायरी रस्त्यावरील एका भागात तसेच केळकर रस्त्यावर राजकीय कार्यकर्त्यांची छायाचित्रे असलेले फलक अद्याप काढले गेले नाहीत. त्यातील एकजण सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाना पेठ परिसर किंंवा मध्यवर्ती शहरात राजकीय कार्यकर्त्यांचे नाव प्रदर्शित होईल, असे छोटे फलक दिसून येतात.महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक कर्मचाऱ्यांनी असे फलक कागदांनी झाकून टाकले होते. आॅईलपेंटने नावे पुसून टाकण्याची दक्षता घेतली होती. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र या दक्षतेचा विसर पडल्याचे दिसून येते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोटारींवर पक्षचिन्ह किंंवा स्वत:चे, नेत्याचे नाव झळकाविले आहे. तेही झाकून टाकणे किंंवा काढून टाकणे आवश्यक असताना मोटारींवरील मजकूर कायम असल्याचे दिसून येतो.