शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विभागातील जंगलाचे वणवे रोखण्यासाठी ‘वन वणवा’ परिषद घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात वनक्षेत्राला मानवी चुकांमुळे लागणाऱ्या वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून वन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात वनक्षेत्राला मानवी चुकांमुळे लागणाऱ्या वणव्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभागाकडून वन वणवा परिषदेचे आयोजन केले आहे. वन विभागाकडून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा प्रशासन अशा यंत्रणांतील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे. दरम्यान लोकसहभागाशिवाय वणवे रोखणे कठीण असल्याचे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

पंधरवड्यापूर्वी कात्रज घाट परिसरात मोठी आग लागली होती. ज्या भागात आग भडकली होती. ते क्षेत्र पीएमआरडीएच्या अखत्यारीत होते. पुणे शहरालगत टेकड्या आहेत. टेकड्यांवर आग लागण्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा मानवी चुकांमुळे आग लागते. आगीत अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती तसेच वृक्षांना झळ पोहोचते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विविध यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या विचाराने वनविभागाकडून वनवणवा परिषदेचे आयोजन केले असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.

वन वणवा परिषदेच्या निमित्ताने, महसूल, महापालिका, पीएमआरडीए तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी एकत्र येऊन उपाययोजना करणार आहेत. शहरी भागातील टेकड्यांवर आग लागल्यास टेकड्यांवर फिरायला येणारे नागरिक वन विभागाला माहिती कळवितात. वनविभागातील एका रक्षकाकडे सातशे ते आठशे हेक्टर क्षेत्र असते. त्याला दोन मदतनीस साहाय्य करतात. टेकडीवर फिरायला येणारे नागरिक वनविभागातील अधिकारी आणि रक्षकांच्या संपर्कात असतात. नियमित फिरायला येणा-या नागरिकांनी समाजमाध्यमावर गट स्थापन केले असून त्याद्वारे आम्हाला माहिती कळविण्यात येते. वनविभागाचा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून माहिती कळविण्यात येते, असे त्यांनी नमूद केले.

शहरात टेकडीवर येणारे काहीजण जळत्या सिगारेटची थोटके टाकतात. काहीजण वनविभागाच्या जागेपासून काही अंतरावर शेकोटी पेटवतात. वनविभागाच्या जगतात चूल पेटवून जेवण केले जाते. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. पुणे जिल्ह्यत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठे आहे. काही भागात ऊस जमिनीला लागूनच वनविभागाच्या जागा असतात. ऊसतोडणी झाल्यानंतर काही शेतकरी उर्वरित राहिलेल्या भागाला आग लावतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. वन वणव्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार असून पुणे-सातारा महामार्गावर लवकरच जागोजागी फलक बसविणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.