शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

खडकाळ माळरानावर फुलविले नंदनवन

By admin | Updated: January 23, 2017 02:19 IST

शेतीतील शिक्षण, अभ्यासाला नियोजनाची जोड दिल्यास खडकाळ माळरानावर नंदनवन बहरू शकते, याचा प्रत्यय काळेवाडी, दिवे

सुनील लोणकर / गराडेशेतीतील शिक्षण, अभ्यासाला नियोजनाची जोड दिल्यास खडकाळ माळरानावर नंदनवन बहरू शकते, याचा प्रत्यय काळेवाडी, दिवे येथील प्रयोगशील शेतकरी नितीन जाधव यांची अंजीर शेती पाहिल्यावर येतो. उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन, दर्जेदार माल पिकवण्याची हातोटी साधत शेतीत सकारात्मक चित्र निर्माण केले आहे. दिवे घाट ओलांडला, की डावीकडे काळेवाडी गाव लागते. काळेवाडी-मल्हारगड रस्त्याला त्यांची शेती आहे. त्यांचे आजोबा विष्णू जाधव यांचा अंजीर उत्पादनात हातखंडा आहे. हे पीक १०० झाडापुरते मर्यादित होते. कोरडवाहू, खडकाळ, मुरमाड क्षेत्र ही मुख्य समस्या होती. पावसाच्या पाण्यावर ज्वारी, बाजरी अशीच पिके घेण्यात येत. नितीन जाधव यांचे वडील दिलीप जाधव सासवड येथे कृषी पर्यवेक्षक आहेत. नोकरीमुळे त्यांना शेतीकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याने आजोबांनंतर नव्या पिढीचे नेतृत्व नितीन जाधव यांच्याकडे आले. शेती करायची असेल तर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची समस्या मिटविण्यासाठी त्यांनी एक कोटी लिटर क्षमतेचे ४५ बाय ४५ मीटर व ३५ फूट खोल शेततळे तयार करून हंगामी विहिरीतून पाणी उपसून त्यात संरक्षित पाणीसाठा केला. शेततळे शेतजमिनीपेक्षा ३५ फूट उंच असल्याने सायफन पद्धतीने ठिबकद्वारे पाणी दिले जाते. शेततळ्यामुळे पाण्याची शाश्वती आल्याने नितीन यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेवून २०११ साली बारामती कृषी विज्ञान केंद्रातून दिनकर वाणाची १९० रोपे आणून सव्वा एकरात लागवड केली. सध्या हीच झाडे चांगले उत्पादन देत आहे.अंजीराचे नियोजन करताना ते शक्य तेवढी रासायनिक खते, कीटकनाशके टाळण्यावर भर देतात. प्रत्येक झाडाला १० किलो शेणखत, ३ किलो निंबोळी खत, तर दीड किलो मासळी खत दिले जाते. एकरी पाच किलो अझोटोबॅक्टर शेण खतात देतात. एकरी दोन ते अडीच किलो ट्रायकोडर्माचा वापर होतो. तांबेरासाठी क्लोरोथॅनील, कार्बेनडाझिम,ठराविक कालावधीत फवारणी, खोडकिडा नियंत्रणात डायक्लोरव्हासची इंजेक्शन, पाणी बहारावेळी १० लिटर, फळे वाढताना २० लिटर, फळे पक्व होताना १० लिटर देतात. नितीन यांच्याकडे बालाजी कोळेकर, सह तीन मजूर बारमाही असतात. याशिवाय झाडांच्या चाळणीचे काम परिसरातील मजुरांच्या टोळ्यांना प्रतिझाड ५० रुपये याप्रमाणे दिले जाते. जुन्या स्कूटरला एचटीपी पंप बसवून कमी खर्चात फवारणी यंत्रणा तयार केली आहे. यासाठी एकूण १५ रुपये हजार खर्च आला. प्रतितास फवारणीसाठी एक लिटर पेट्रोल लागते. नितीन हे बीएससी हॉर्टिकल्चर व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेतील पदवीधर आहे. तसेच अ‍ॅग्री क्लिनिक अँड अ‍ॅग्री बिजनेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.