शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅक्टिकलवर भर द्यावा

By admin | Updated: March 21, 2017 05:13 IST

थेरॉटिकलऐवजी प्रॅक्टिकलवर अधिक भर द्यायला हवा. प्रॅक्टिकल नॉलेज असेल तरच यशस्वी इंजिनियर होवू शकतो. यासाठी

पिंपरी : थेरॉटिकलऐवजी प्रॅक्टिकलवर अधिक भर द्यायला हवा. प्रॅक्टिकल नॉलेज असेल तरच यशस्वी इंजिनियर होवू शकतो. यासाठी जे निकष आहेत ते महाविद्यालयांकडून पाळले जावेत, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी यासाठी शासनाकडून काटेकोर लक्ष दिले जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. पिंपरीतील एच. ए. मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेतर्फे डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहकार्याने १७ ते २० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘डिपेक्स’ प्रदर्शनाचा समारोप सोमवारी झाला. या कार्यक्रमात तावडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शिक्षण पद्धतीतील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तावडे बोलत होते. ते म्हणाले की, प्रॅक्टिकलमधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिकता येते. डिग्री कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये पाठविणे गरजेचे आहे. पदवीधारक हा केवळ थेरॉटिकल मास्टर नसून प्रॅक्टिकल मास्टर असणे आवश्यक आहे. अशा प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे टॅलेन्ट पहायला मिळते. याचा विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा व्हावा, यासाठी या टॅलेंटला मार्केटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पांमधून मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र संकल्पनेलादेखील चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.या वेळी अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष छगन पटेल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील, सृजन संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, अभाविपचे शहरमंत्री नकुल वाझे, निमंत्रक गजानन वाबळे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या निवडणुकात चांगले नेतृत्व समोर येते. या निवडणुकांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. त्याचा बाऊ करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विनोद तावडे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी व्यासपीठावरून खाली उतरून विद्यार्थ्यांमध्ये आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांचा माईक बंद पडला. त्यावर शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचूच दिले जात नाही, अशी टिपण्णी त्यांनी केली. (प्रतिनिधी)